शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरले '२ लाख'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 17:04 IST

हवेलीच्या कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील घटना

लोणी काळभोर : पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या कारची काच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरटयांपैकी एकाने सिमेंट ब्लॉकने फोडून तब्बल २ लाख ३५ हजार चोरल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच महत्वाची कागदपत्रे लंपास झाली आहेत. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली.  

याप्रकरणी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पृथ्वीराज हिरामण काकडे ( वय ३३, रा. काकडे मळा, थेऊर, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  शनिवारी दुपारी ३ ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काकडे यांनी दुपारी १ - १५ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथे मॅक्डोनल्डस् सिसिडी येथे मावस भाऊ निखील उंदरे यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपये उसने घेतले. सदरची रक्कम त्यांनी सँकमध्ये ठेवली. ते आपली कार घेऊन कुंजीरवाडी येथील ऑटो कॉर्नर पेट्रोल पंप येथे पोहोचले. तेथे डिझेलचे १ लाख ६० हजार रुपये चेक पेमेंट केले.

त्यानंतर कार पंपाच्या डाव्या बाजूस पार्क करुन ३  वाजण्याच्या सुमारास पंपासमोर असलेल्या ऑफिस मध्ये गेले. थोड्या वेळाने ऑफिसच्या शेजारी  असणाऱ्या लॉन्ड्रीवाल्याने त्यांना कोणीतरी तुमच्या कारची काच फोडल्याचे सांगितले. काकडे त्याच क्षणी कार जवळ गेले असता २ लाखांसहित कागदपत्रे चोरून नेल्याने त्यांचय निदर्शनास आले. असे फिर्यादीत नमूद केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbikeबाईक