शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी

By नारायण बडगुजर | Updated: May 27, 2025 20:40 IST

१५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या, त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याने आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे

पिंपरी : वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी हा खून असल्याचे म्हटले आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असे माझे म्हणणे आहे, असे सांगत वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी याप्रकरणी कसून चौकशी होण्याची मागणी केली आहे.

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणानंतर हगवणे कुटुंबियांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, त्याबाबत माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे म्हणाले, ’’शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा होत्या. यातील १५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आली होती. यावरून ही आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे. तसेच उर्वरीत वळ व जखमा जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात वैष्णवीला सतत मारहाण करून छळ करण्यात येत होता, हे त्यावरून सिद्ध होत आहे. तसेच याप्रकरणात चांगला वकील नियुक्त करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला या प्रकरणातील माहिती कळविण्यात यावी तसेच तपास एसआयटीकडे देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.’’ 

...म्हणून लावून दिले होते लग्न!

दरम्यान, वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, ‘‘वैष्णवी आणि शशांक यांचे लव्ह मॅरेज आहे. त्यांच्या लग्नाला सगळ्यांचा विरोध होता. घरातील सगळ्यांचा विरोध असूनही वैष्णवीने माझ्याकडे लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता. तिला त्याच्याशीच लग्न करायचे होते. त्यांच्या घरात यावरून वाद झाले. त्यावेळी वैष्णवीचे वडील आनंद यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी आपण पळून जाऊन लग्न करू असे तिला शशांक म्हणाला होता. त्यावेळी तिने पळून लग्न करणार असल्याचे माझ्या मुलाला सांगितले. असा काही निर्णय घेऊ नको. तुझे वडील आयसीयूमध्ये आहेत, असे सांगून माझ्या मुलाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे माझ्या मुलाने लगेच मला फोन करून सांगितले. आम्ही धावतपळत घरी आलो. तिला समजावून सांगितले. तसेच शशांकला फोन करून सांगितले की आपण याबाबतचा निर्णय नंतर घेऊ. त्यानंतर आपली समाजात बदनामी होऊ नये. म्हणून लग्न लावून दिले. 

वैष्णीव म्हणाली, ‘‘माझी चूक झाली...’’

वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘‘लग्नानंतर सहा महिन्यांनी वैष्णवीचा सासरच्यांकडून छळ सुरू झाला. त्यावर मी तिला म्हणालो, वैष्णवी काय प्रकार आहे हा? त्यावर ती म्हणाली, मामा हे लग्न करून माझी चूक झाली. तिच्या सासरच्यांनी तिचा छळ करून तिला मृत्यूस कारणीभूत ठरले. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.’’

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाwakadवाकडCourtन्यायालय