मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:22 IST2025-05-19T11:21:59+5:302025-05-19T11:22:20+5:30

हायवा चालकाने निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत स्पीडब्रेकर आल्याने पाठीमागे न बघता अचानक ब्रेक मारला

11-year-old boy dies after hitting highway while going to tuition on bike with elder sister | मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू

मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू

पुणे: मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू झाला. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंशुमन गायकवाड (११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. त्याची बहीण तन्मयी अनुपकुमार गायकवाड (२३, रा. केशवनगर) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार हायवा चालक राजाराम दयाराम राठोड (४८, रा. वडगाव शेरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास झेन्सार ग्राऊंड समोरील रोडवर, खराडी येथे दुचाकीस्वार तन्मयी तिचा लहान भाऊ अंशुमन याला ट्यूशन क्लासला घेऊन जात होती. यावेळी एक हायवा त्यांच्या दुचाकीसमोरून जात होता. हायवा चालकाने निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत स्पीडब्रेकर आल्याने पाठीमागे न बघता अचानक ब्रेक मारला. यामुळे हायवाच्या पाठीमागे असलेल्या तन्मयीचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती दुचाकीसह हायवाला पाठीमागून धडकली. यात तन्मयी डाव्या बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाली. मात्र, अंशुमन हायवाच्या मागील चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तांगडे करत आहेत.

Web Title: 11-year-old boy dies after hitting highway while going to tuition on bike with elder sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.