मोदी-शहांनी फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं, आता दोघांनीही राजीनामा द्यावा; नवाब मलिक यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 05:36 PM2021-05-02T17:36:28+5:302021-05-02T17:47:14+5:30

पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

west bengal election 2021 Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi | मोदी-शहांनी फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं, आता दोघांनीही राजीनामा द्यावा; नवाब मलिक यांचा हल्लाबोल

मोदी-शहांनी फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं, आता दोघांनीही राजीनामा द्यावा; नवाब मलिक यांचा हल्लाबोल

Next

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचं आव्हान फोडून काढत घवघवीत यश प्राप्त केल्याचं सध्याच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींचेच सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

"देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शहा यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हाच आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शहा आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा", असं नवाब मलिक म्हणाले आहेत. (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi)

"ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपाने पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून ठोकलंय"

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारात फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं होतं. अबकी बार २०० पार असा प्रचार केला गेला होता. मग आता काय झालं? निवडणूक निकालाचं मोदी आणि शहा यांनी उत्तर द्यायला हवं, असंही मलिक म्हणाले. 

चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 209 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदार संघावर सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं होतं. या मतदार संघातून ममता बॅनर्जी आणि तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी ३७२७ मतांनी विजय साजरा केला आहे. 
 

Web Title: west bengal election 2021 Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.