West Bengal Results 2021: लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:35 PM2021-05-02T16:35:29+5:302021-05-02T17:11:42+5:30

West Bengal Election Result 2021CM Mamata Banerjee wins Nandigram Constituency by 1200 Votes : ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला आहे.

West Bengal Election Result 2021 CM Mamata Banerjee wins Nandigram constituency by 1200 votes, defeating BJP's Suvendu Adhikari | West Bengal Results 2021: लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

West Bengal Results 2021: लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

googlenewsNext

नवी दिल्ली - सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यावर गेल्या काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केलेल्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, असं म्हटलं होतं. यानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. याच दरम्यान आता ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. चुरशीच्या लढतीत दिदींनी माजी सहकाऱ्याला पराभूत केले आहे. 

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला आहे. पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी  ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या 1500 मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत 8000  वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. भाजपाला सुरुवातीला समसमान आघाडी मिळत असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हळूहळू टीएमसीने मोठ्या अंतराने भाजपाला मागे टाकले आणि भाजपाचा हा उत्साह मावळला. टीएमसी जिंकत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे ममतांच्या नंदीग्रामवर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते. यानंतर अखेर नंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या आहेत. अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय झाला आहे.

टीएमसीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पश्चिम बंगालमधील 65 विधानसभा जागांवर अधिकारी कुटुंबाची मजबूत पकड आहे. या जागा राज्यातील सहा जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. सुवेंदू अधिकारी यांच्या प्रभावाखाली असलेल्या जागांची संख्या राज्यातील एकूण 294 जागांपैकी पाचपेक्षा जास्त आहेत. सुवेंदू अधिकारी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे 1982 मध्ये कांथी दक्षिणमधून काँग्रेसचे आमदार होते. मात्र, नंतर ते तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक झाले. सुवेंदू अधिकारी 2009 पासून कांथी मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2007 मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये इंडोनेशियन रसायन कंपनीविरूद्ध भूसंपादनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 

"पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय"; अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आणि भाजपाला (BJP) सणसणीत टोला लगावला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय असं म्हणत अखिलेश यांनी निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भाजपाने एका महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचं जनतेनं दिलेलं उत्तर आहे. 'दीदी ओ दीदी'ला चोख प्रत्युत्तर दिलं आहे" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.

Web Title: West Bengal Election Result 2021 CM Mamata Banerjee wins Nandigram constituency by 1200 votes, defeating BJP's Suvendu Adhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.