West Bengal Election Result 2021: चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:59 PM2021-05-02T16:59:02+5:302021-05-02T17:01:44+5:30

West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठी आघाडी; ममता बॅनर्जींचा नंदिग्राममध्ये विजय

West Bengal Election Result 2021 4 AM played crucial role in mamata banerjee and tmc victory | West Bengal Election Result 2021: चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी

West Bengal Election Result 2021: चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी

Next

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवून दिला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर भारतीय जनता पक्षाला ७५ च्या आसपास जागांवर यश मिळताना दिसत आहे. ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी, राज्यात सत्ताबदल घडवण्यासाठी भाजपनं जंगजंग पछाडलं. मात्र तरीही ममता बॅनर्जींनी हॅटट्रिक केली आहे. ममता बॅनर्जींच्या विजयात ४ एम महत्त्वाचे ठरले.

आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा

मतुआ समाजाची साथ
मतुआ समाजाची लोकसंख्या पश्चिम बंगालमध्ये २ कोटी इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू असताना बांगलादेश दौऱ्यावर होते. त्यावळी त्यांनी तिथे मतुआ समाजाच्या देवळात जाऊन पूजा केला. मात्र याचा कोणताही भाजपला मतदानात झालेला दिसला नाही.

बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का

मुस्लिम मतदार ममतांसोबत
जय श्रीराम म्हणत केलेली घोषणाबाजी, बेगम म्हणत ममता यांच्यावर केलेली टीका यांच्या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी बंगालमध्ये उमेदवार दिले होते. मात्र तरीही मुस्लिम मतदारांनी ममतांना साथ दिली.

महिलांचा दिदींना पाठिंबा
राज्यातील महिला मतदारांनी तृणमूलला भरभरून मतदान केलं. बिहारमधील महिला मतदार नितीश कुमार यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. त्याचा फायदा संयुक्त जनता दलासह भाजपलाही झाला. मात्र पश्चिम बंगालमध्ये त्याच्या अगदी उलट घडलं.

ममता नावाचा ब्रँड
ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेली जखम, त्यांनी व्हिलचेअरवरून केलेला प्रचार यावरून भाजपनं त्यांना लक्ष्य केलं. मात्र त्याचा नेमका उलटा परिणाम दिसला. पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत 'दीदी ओ दीदी' म्हणत ममतांवर निशाणा साधला. ममता यांच्यावर केलेल्या शेरेबाजीचा भाजपला फटका बसला. 

Web Title: West Bengal Election Result 2021 4 AM played crucial role in mamata banerjee and tmc victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.