शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिसरा टप्पा: ३९२ उमेदवार कोट्यधीश, ११ जणांची मालमत्ता शून्य; २३ अंगठेबहाद्दर, ७८८ पाचवी ते बारावी शिकलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:33 IST

१८३ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली नाही पॅनकार्डची माहिती

नवी दिल्ली : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ टक्के उमेदवार करोडपती असून ज्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही असे ११ उमेदवारही रिंगणात आहेत. एकूण ३९२ उमेदवार करोडपती असून त्यात समाजवादी पार्टीचे ९ (९० टक्के), भाजपचे ८४ टक्के, कॉँग्रेसचे ८२ टक्के उमेदवार आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेसचे ७०%, माकपाचे ५३ %, सेनेचे ४१ % तर बसपाचे १३ % कोट्यधीश आहेत. उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.९५ कोटी आहे.

बहुजन मुक्ती पार्टीचे जे. पी. लडाकभाई, भारतीय ट्रायबल पार्टीचे बी. वन्साभाई खुलत, नवसर्जन भारत पार्टीचे एच. आर भानाभाई, भारतीय पीपल्स पार्टीचे शंकर जाधव यांच्यासह अन्य सात अपक्षांनी आपल्याकडे शून्य मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील सपाचे उमेदवार देवेंद्र सिंह यादव यांची मालमत्ता २०४ कोटी असून ती या टप्प्यातील सर्वाधिक आहे. यापाठोपाठ राष्टÑवादीचे साताºयामधील उमेदवार उदयनराजे भोसले (१९९ कोटी) व बरेलीचे कॉँग्रेस उमेदवार प्रवीण सिंह आरोन (१४७ कोटी) हे कोट्यधीश आहेत. १८३ उमेदवारांनी पॅनकार्डची माहिती दिलेली नाही. असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने तिसºया टप्प्यात होत असलेल्या ११७ मतदारसंघांतील १६०० उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून हा अहवाल जारी केला आहे.

२३ अंगठेबहाद्दर
२३ अंगठेबहाद्दर उमेदवारही आहेत. ४९% (७८८) उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते १२वी दरम्यान आहे तर ४३% (६७१) उमेदवार हे पदवीपर्यंत शिकलेले आहेत. या टप्प्यातील सर्वाधिक ७६० (४८%) उमेदवार हे ४१ ते ६० वयोगटातील असून त्याखालोखाल ३५% (५६२) उमेदवार २५ ते ४० वयोगटातील आहेत. १७% (२६५) उमेदवार ६१ ते ८० वयोगटातले असून तीन उमेदवारांचे वय ८० वर्षांहून अधिक आहेत. चार उमेदवारांनी आपले वय नमूद केलेले नाही.

230 उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे आहेत. ३० जणांविरुद्ध खुनाचे, १४ जणांविरुद्ध अपहरणाचे तर २९ उमेदवारांच्या विरोधात महिलांबाबतच्या अत्याचाराचे गुन्हे आहेत.

63 मतदारसंघ हे संवेदनशील आहेत. ज्या मतदारसंघामध्ये तीन किंवा त्याहून जास्त उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात असे मतदारसंघ संवेदनशील मानले जातात.

तिसºया टप्प्यातील जागांचा आढावा
आसाम : ४
एआययूडीएफ :
डुबरी, बारपेटा
अपक्ष : कोकराझार
भाजप : गुवाहाटी
ओडिशा : ६
बिजद : पुरी, भुवनेश्वर, कटक, धेनकनाल, संबलपूर, केनझाल.
बिहार : ५
भाजप : झांजरपूर
कॉँग्रेस : सुपौल
राजद : अरारिया, माधेपुरा
लोजसपा : खगरिया
छत्तीसगड : ७
भाजप : कोरबा, सरगुजा, बिलासपूर, रायपूर, रायगढ, झांजगिर : चंपा,
कॉँग्रेस : दुर्ग
गुजरात : २६
भाजप : कच्छ, बनासकांठा,
पाटण, मेहसाणा, साबरकांटा, गांधीनगर
अहमदाबाद (पूर्व), अहमदाबाद (पश्चिम), सुरेंद्रनगर, राजकोट, पोरबंदर, जामनगर, जुनागड, अमरेली, भावनगर, आणंद, खेडा, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, छोटा उदयपूर, भरूच. बारडोली, सुरत, नवसारी, बलसाड
गोवा : २
भाजप : उत्तर गोवा, दक्षिण गोवा
जम्मू-काश्मीर : १
पीडीपी : अनंतनाग
कर्नाटक : १४
भाजप : बागलकोट, बेळगाव, विजापूर, बिदर, कोप्पळ, दावणगेरे, शिमोगा
कॉँग्रेस : चिक्कोडी, गुलबर्गा, रायचूर, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड
केरळ : २०
कॉँग्रेस : अळपुळा अर्नाकुलम, कोळीकोड मावेलीक्कारा, पटणमतिट्टा, तिरुअनंतपूरम, वडक्कडा,
वायनाड
माकपा : अलाथूर, अतिंगल, कन्नूर, कासारगोड, पलक्कड
भाकप : त्रिसूर
आरएसपी : कोल्लम
मुस्लीम लीग : पोन्नानी, मल्लापूरम
अपक्ष : चलकुडी, इडुक्की
अन्य : कोट्टायम
त्रिपुरा : १
माकपा : त्रिपुरा पूर्व
उत्तर प्रदेश : १०
भाजप : मोरादाबाद, रामपूर, पिलभित, बरेली, आयोना, बदाऊन, संबल, इटाह
सपा : मैनपुरी, फिरोजाबाद
प. बंगाल : ५
तृणमूल कॉँग्रेस : बालूरघाट
कॉँग्रेस : जांगीपूर, माल्डा उत्तर, माल्डा दक्षिण
माकपा : मुर्शिदाबाद
दादरा नगर
हवेली : १
भाजप :
दादरा नगर हवेली
दमण-दीव : १
भाजप : दमण-दीव

तिसºया टप्प्यात गाजलेले मुद्दे
या टप्प्यातही निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञासिंह, मिलिंद देवरा, मुख्तार अब्बास नक्वी आदींच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या नोटीस जारी केल्या.
प्रचारादरम्यान, भाजपचे भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलचे आणि बाबरी मशीद पाडल्याचे वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
हार्दिक पटेल यांच्यावर सभेत एका व्यक्तीने कानशिलात मारली तर नोटाबंदीवरून भाजप नेत्यावर जोडा फेकण्यात आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक