शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"साहेब विजय सत्याचाच होईल", समर्थकांचा सोशल मीडियातून धनंजय मुंडेंना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 21:05 IST

तक्रारदार महिलेने सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला.

मुंबईराज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. 

तक्रारदार महिलेने सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या खुलाशानंतर त्यांच्या समर्थकांनीही सोशल मीडियात मुंडे यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर तर #We_Support_Dhananjay_munde हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. 

अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीचा आढावाच कमेंटमध्ये मांडून त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती देऊ केलीय. तर काहींनी धनंजय मुंडेंनी स्वत:हून समोर येऊन संबंधित महिलेसोबतच्या संबंधांची कबुली देऊन वस्तुस्थिती मांडल्याबाबत त्यांच्या पाठिशी उभं राहणं पसंत केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आजवर अनेक राजकीय संकटं आली आहेत. संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजला आहे. पण त्यांची माणसं आणि त्यांची माती त्यांच्यासोबत आहे, असंही काहींनी म्हटलंय.

मुंडे आज नेहमीप्रमाणे 'जनता दरबारात'धनंजय मुंडे प्रत्येक आठवड्याच्या दर गुरुवारी 'जनता दरबार' भरवतात. यात ते सर्वसामन्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. धनंजय मुंडे यांनी नेहमीप्रमाणे आजही जनता दरबाराला हजेरी लावली. पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. 

शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्षमुंडे यांच्यावरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार यांनी आज त्याबाबत सूचक विधानही केलं आहे. "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले आहेत. 

 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRapeबलात्कारMumbai policeमुंबई पोलीस