शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 21:10 IST

Maharashtra Politics : काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा सुरू आहे..

मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीतून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. तीन पक्ष एकत्र आल्याने या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच कमीअधिक प्रमाणात मतभेद निर्माण होत होते. मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा सुरू आहे.. जलसंपदा विभागातील सचिवांच्या निवडीवरून मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये मतभेद झाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. 

या संदर्भातील वृत्त टीव्ही नाईनने दिले आहे.  या खडाजंगीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यातच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना हटवून त्यांच्याऐवजी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी ही बाबत शरद पवार यांच्या कानावर घातली आहे.  दरम्यान, याबाबत आज जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चा बाहेर न सांगण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात चर्चिले गेलेले विषय बाहेर सांगू नयेत, असे मला वाटले. बाकी मला जे काही बोलायचे आहे ते मी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी