या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने घेतला राजकारणाऐवजी अमेरिकेला जाण्याचा निर्णय, भाजपाचा केला असा उल्लेख 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:11 PM2021-07-28T17:11:32+5:302021-07-28T17:12:16+5:30

Politics News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan ) यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे.

The son of Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chauhan decided to go to America instead of politics | या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने घेतला राजकारणाऐवजी अमेरिकेला जाण्याचा निर्णय, भाजपाचा केला असा उल्लेख 

या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने घेतला राजकारणाऐवजी अमेरिकेला जाण्याचा निर्णय, भाजपाचा केला असा उल्लेख 

Next

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan ) यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. कार्तिकेय यांनी बुधनी या आपल्या गावात एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुढील शिक्षणासाठी परदेशात जात असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांचे वडील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि आई साधना सिंह हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी कार्तिकेय यांनी एक भावूक भाषण केले या भाषणात त्यांनी भाजपाचा उल्लेख आपली आई असा केला. (The son of Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chauhan decided to go to America instead of politics)

कार्तिकेय यांनी बुधनी येथे कार्यकर्ते आणि जनतेसमोर आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले की, मी माझ्या जीवनातील अनेक बाबींसाठी स्वत:ला भाग्यवान समजतो. सर्वप्रथम मला असे आई-वडील मिळाले, ज्यांनी मला जीवनातील सर्व सुख दिले. त्यानंतर तुमच्यासारखे सहकारी मिळाले. आम्ही त्यांना कधी कार्यकर्ते म्हटले नाही तर मोठे भाऊ, कुटुंबातील सदस्य मानले. मात्र केवळ सांगून काही कुणी मोठा होत नाही. तुम्ही सर्वजण माझे जवळचे आहात असे मी मानतो. तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहात. मी २०१२ पासून तुमच्यामध्ये आहे. तुम्ही सर्वांनीच जीवनामध्ये मला हे सर्व काही मिळवून दिलं आहे, त्या ऋणातून मी कधीही मुक्त होणार नाही. म्हणूनच आज मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्यामध्ये आलो आहे.

मी बऱ्याच काळापासून तुमच्यामध्ये सक्रिय आहे. २०१८ मध्ये मी कायद्याचे शिक्षण पुण्यातीली सिम्बॉयसिस इन्स्टिट्युटमधून पूर्ण केले. प्रत्येक विद्यार्थ्याची एक इच्छा असते की, पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यावं  मात्र २०१८ मध्ये आधी विधानसभा आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक आली. त्यामुळे पक्ष ही माझी आई आहे असं समजून मी माझं काम केलं. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम, वात्सल्य ही माझी ताकद आहे. तुमच्यासापासून मी तनाने जरूर दूर जात आहे. मात्र मनाने मी तुमच्यासोबतचे असेन. तुमच्या सुख-दु:खातही जरूर तुमच्यासोबत असेन आपण एकत्र मिळून हे काम पुढे नेले पाहिजे. थोड्या अर्धविरामानंतर पुन्हा आपण सर्वजण एकत्र येऊन काम करणारच आहोत. आता तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मी सोबत घेऊन जात आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कार्तिकेय आणि कुणाल हे दोन पुत्र आहेत. त्यांच्यापैकी कार्तिकेय यांनी सिंबॉयसिस पुणे येथून कायद्याची पदवी घेतली आहे. आता ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया येथे जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकेय तिथे लॉ विषयामध्ये पदव्यूत्तर पदवी घेणार आहेत.  

Web Title: The son of Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chauhan decided to go to America instead of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.