शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

३३ टक्के का?, महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं पाहिजे; प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 11:37 IST

महिलांची लोकसंख्या अर्धी असताना त्यांना नेतृत्वही अर्धच दिलं गेलं पाहिजे असं मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.

ठळक मुद्देमहिलांची लोकसंख्या अर्धी असताना त्यांना नेतृत्वही अर्धच दिलं गेलं पाहिजे असं मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.तामिळनाडूतही ३३ टक्के तिकिटं महिलांना देण्यात यावी, कार्ति चिदंबरम यांचं ट्वीट

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या निमित्तानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला खासदारांनी आपले विचार मांडले. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात महिला खासदारांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या दरम्यान, महिला आरक्षणाचा विषय सभागृहात आला. महिलांना केवळ ३३ टक्के आरक्षण का दिलं जात आहे? महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सभागृहात यावर भाष्य केलं. "देशात २४ वर्षांपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. परंतु आता ते ३३ टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के केलं गेलं पाहिजे. जेव्हा देशातील महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे तर महिलांचं प्रतिनिधीत्वदेखील ५० टक्के असलं पाहिजे," असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. "लॉकडाऊनदरम्याम महिलांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो डोमेस्टिक रूपापासून मानसिक रुपापर्यंत आहे. अशा परिस्थितीत या विषयांवर सभागृहात चर्चा होणं आवश्यक आहे. महिलांना त्यांचे अधिकार देणं आवश्यक आहे," असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबद्दल सदनात भाष्य केलं, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते कार्ति चिदंबरम यांनीदेखील एक ट्वीट केलं. "तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान ३३ टक्के तिकिटं ही महिलांनाच देण्यात यावी," असं आवाहन त्यांनी केलं. राहुल गांधींचंही ट्वीट  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिला इतिहास आणि भविष्य घडविण्यात सक्षम असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. महिला इतिहास घडवू शकतात. कुणाला हे रोखण्याची परवानगी देऊ नका, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाParliamentसंसदWomenमहिलाreservationआरक्षणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस