शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार सरकार बरखास्त करा -तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 06:18 IST

आमदारांना मारहाण प्रकरण तापले

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांना झालेल्या मारहाणीचा विषय पुन्हा तापत चालला आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी केली.आमदारांना मारहाणीच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यवहार किंवा मर्यादेची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.सिन्हा म्हणाले की, आमदारांच्या प्रतिष्ठेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि सभागृहाची अस्मिता सर्वांत मोठी आहे. आमदारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाईचे निर्देश आयुक्त तथा पोलीस महानिरीक्षकांना सिन्हा यांनी दिले. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा परिसरात आमदारांना बुटांनी मारहाण करणारे दोषी पोलीस अधिकारी आणि जवानांंवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तेजस्वी यादव यांनी पत्रात लिहिले की, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर ज्या प्रकारे सभागृहात विरोधी सदस्यांना क्रूरपणे मारहाण करून ‘बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयक २०२१’ ज्या प्रकारे संमत केले गेले ते लोकशाहीला घातक आहे. राज्यपालांना पत्र लिहून त्यांनी सरकार बरखास्त करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली.नितीशकुमारांनी घेतला चिराग यांचा बदलालोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि संसद सदस्य चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू व मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. निवडणुकीच्या सहा महिन्यांनंतर अखेर नितीशकुमार यांनी चिराग यांचा बदला घेतला आहे.एलजेपीचे एकमेव आमदार राजकुमार सिंह यांना जेडीयूत दाखल करून घेतले आहे. राजकुमार सिंह हे मटिहानीचे आमदार आहेत. पक्षाच्या महासचिवांकडून कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर ते नाराज होते. त्यातूनच त्यांनी जेडीयूत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत पासवान यांच्या लोजपाने जेडीयूच्या व्होट बँकेला मोठा हादरा दिला. जेडीयूचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेचे जेडीयू केवळ ४३ जागा जिंकू शकला.या निवडणुकीत सर्वाधिक ७५ जागा राजदने जिंकल्या. भाजपने ७४, तर लोजपाने एक जागा जिंकली. राजकुमार सिंह म्हणाले की, हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव