शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप

By मोरेश्वर येरम | Published: January 21, 2021 1:58 PM

"नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे. 

कोकणातील बहुचर्चित आणि वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे. 

नाणार प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर नाणार प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. पण आता नाणार प्रकल्प पुन्हा एकदा कोकणातच सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. यावरुनच निलेश राणे यांनी ट्विट करत नाणार प्रकल्प शंभर टक्के कोकणातच पुन्हा एकदा आणला जाणार असा दावा केला आहे. 

"१०० टक्के नाणार प्रकल्प राजापूर तालुक्यात आहे तिथेच राहणार. खासदार विन्या राऊतला कोण विचारतं?? मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने बाधित जमिनीमध्ये कमिशन घेतले आहे व खरेदी केलेली आहे म्हणून काही करून मुख्यमंत्री आहे त्याच जागेवर प्रकल्प ठेवणार...पडद्याआड सगळं ठरलं आहे", असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. 

निलेश राणे यांच्या ट्विटने आता मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यानं हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे. 

प्रमोद जठारांनीही केला होता आरोपनाणार रिफायनरीला विरोध असल्याचे आणि ती होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन सांगून गेले. पण याच ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांनी नाणारला लागणारी जमिन खरेदी केली आहे, हिंमत असेल तर पाहायला या पुरावे दाखवतो, असा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी याआधी केला होता. या आरोपातून जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही अप्रत्यक्षपणे नाव घेतले होते.  

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्पRaj Thackerayराज ठाकरे