शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसचा विचारच देशाला वाचवू शकतो -  नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:09 IST

Nana Patole : देशाला केवळ काँग्रेसचा विचारच वाचवू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारंजा येथे केले.

कारंजा लाड : काँग्रेस पक्षाचा विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आहे. देशभरात सध्या कठीण परिस्थिती निर्माण झाली असून, आता देशाला केवळ काँग्रेसचा विचारच वाचवू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी कारंजा येथे ९ जून रोजी आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले.
अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ.वजाहत मिर्झा, आ.कुणाल पाटील, माजी आ.नातिकोद्दीन खतीब, निरीक्षक अतुल लोंडे, आमदार अमित झनक, जिल्हा निरीक्षक प्रकाश साबळे, जिल्हाध्यक्ष एड. दिलीप सरनाईक, मो.युसूफ पुंजानी, जिल्हा प्रवक्ता दिलीप भोजराज आदींची उपस्थिती होती. नाना पटोले म्हणाले की, कोरोना काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या कामाची शाब्बासकी देण्यासाठी तसेच तिसऱ्या लाटेत करावयाच्या उपाययोजनांच्या आढावा घेऊन शासनाच्या माध्यमातून प्रश्‍न सोडवण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. 
केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून धान्याची भीक देत आहे. द्यायचेच असेल तर पैसे द्यावे.  नुकतेच काँग्रेसच्यावतीने राज्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. केंद्र सरकार पेट्रोलच्या मूळ किमतीवर १८ रुपये प्रती लिटर रस्ते विकासाचा कर घेते. पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले असून डिझेलही लवकरच शतक गाठणार आहे. वाजपेयी सरकार ते डॉ. मनमोहनसिंग सरकारपर्यंत १ रुपया रस्ते विकासाचा कर घेतल्या जात होता. त्यावेळी १९ हजार कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत जमा होत होते, असे त्यांनी सांगितले. 
मोदी सरकारने खासगीकरण करण्याचा सपाटा लावला. शासकीय कंत्राटदारांकडून इस्टिमेट केले जात आहे. रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा घणाघाती आरोपही पटोले यांनी केला.  भाजपने ओबीसींचे नुकसान  केल्याने त्यांना ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्याचा अधिकार नसल्याचेही पटोले म्हणाले. 
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष रमेश लांडकर, शहराध्यक्ष हमीद शेख यांनी पुढाकार घेतला. संचालन शमीम फरहत यांनी तर आभार अ‍ॅड. फिरोज शेकूवाले यांनी मानले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसKaranjaकारंजा