शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या विधानाची मोडतोड केली गेली, खरं वृत्त 'लोकमत'नं प्रसिद्ध केलंय"; जयंत पाटील यांचा खुलासा

By मोरेश्वर येरम | Updated: January 21, 2021 17:07 IST

"मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे"

ठळक मुद्देजयंत पाटील यांनी केला 'त्या' विधानाबाबतचा खुलासाप्रसारमाध्यमांकडून चुकीच्या पद्धतीनं विधान चालवलं जात असल्याचं पाटील म्हणालेमुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानावर अखेर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या इच्छेबाबतच्या  राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विधानावरुन सद्या जोरदार चर्चा सुरु असतानाच खुद्द जयंत पाटील यांनीच याबाबतचा सविस्तर खुलासा केला आहे. 

"मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे. माझं व्हर्जन जे आहे  ते लोकमतमध्ये व्यवस्थित देण्यात आलं आहे. ते मी ट्विटही केलं आहे", असं जयंत पाटील म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मुख्यमंत्रिपदाची इच्छा असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत केल्याचं वृत्त आज सकाळपासून माध्यमांमध्ये सुरू होतं. भाजप नेत्यांकडूनही जयंत पाटील यांच्या विधानावर टीका करण्यात आली. भाजप नेते अतुल भातळखकर यांनी 'आता महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत', असा टोला लगावला होता. आता खुद्द जयंत पाटील यांनी अशाप्रकारचं कोणताही विधान केलं नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक ट्विटही केलं आहे.  

"इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमतमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती", असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं. ट्विटसोबतच पाटील यांनी 'लोकमत'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटोही ट्विट केला आहे.

जयंत पाटील मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जयंत पाटील यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हावसं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. "आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेलंच नाही", असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुलाखतकारानं पण तुमची इच्छा आहे का? असं जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर पाटील म्हणाले, "माझी इच्छा असणारच ना...प्रत्येक राजकारणाऱ्याला मुख्यमंत्री व्हावसं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल. शरद पवार जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा सगळ्यांनाच असते. मला वाटतं की इतक्या दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रत्येकाला किंवा माझ्यापेक्षा मतदारांनाही इच्छा असू शकते. परंतु परिस्थिती, सध्याची संख्या पाहता आमचे ५४ आमदार आहेत. त्यात मला वाटत नाही शक्य होईल. आमचा पक्ष वाढला पाहिजे", असं जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण