शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

'इंदिरा गांधींना 1971च्या युद्धाचं श्रेय दिलं जातं; मग मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये?'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:49 AM

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचा सवाल

नवी दिल्ली: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना 1971 च्या युद्धातल्या विजयाचं श्रेय दिलं जातं, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालाकोटचं श्रेय का देऊ नये, असा सवाल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विचारला. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याचा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केला. त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी जोरदार टीका केली. स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा जेव्हा शेजारी देशांसोबत युद्धं झाली, तेव्हा त्यातील विजयाचा किंवा पराभवाचा संबंध थेट तत्कालीन सरकारच्या, तेव्हाच्या पंतप्रधानांच्या कामगिरीशी जोडण्यात आला, असं सिंह म्हणाले. त्यामुळेच 1971 मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचं श्रेय इंदिरा गांधींना दिलं जातं. बांगलादेशच्या निर्मितीबद्दल त्यांचं कौतुक होतं. तर 1962 मध्ये चीनविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरलं जातं, असं सिंह यांनी म्हटलं. देशातील सर्वसामान्य जनता एअर स्ट्राइक केल्याबद्दल मोदींचं कौतुक करत आहे. देशवासीयांकडून सुरू असलेलं हे कौतुक काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कसं काय थांबवणार, असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला. भारतीय जनता संघाचे तत्कालीन इंदिरा सरकारसोबत राजकीय मतभेद होते. पण पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांनी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता, असंही सिंह यांनी म्हटलं. मात्र आता सत्तेसाठा आसुसलेला काँग्रेस पक्ष अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Indira Gandhiइंदिरा गांधीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसBJPभाजपा