Join us  

KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज भिडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 8:07 PM

Open in App

IPL 2024, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज भिडत आहेत. KKR ८ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर DC ने १० सामन्यात १० गुण मिळवून सहाव्या क्रमांकावर मजल मारली आहे. पण, KKR ला मागील सामन्यात हार पत्करावी लागली होती, तर DC सलग २ विजयांमुळे आत्मविश्वासने मैदानावर उतरला आहे. DC ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, KKR समोर तगडे लक्ष्य ठेवण्याचा निर्धार रिषभ पंतने व्यक्त केला. 

Milestones Alert:

  • वेंकटेश अय्यरला षटकारांची फिफ्टी साजरी करण्यासाठी दोन उत्तुंग फटक्यांची गरज आहे
  • अक्षर पटेलने तीन चौकार खेचल्यास तो आयपीएलमध्ये चौकारांचे शतक पूर्ण करेल
  • श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये ३००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त ६ धावा हव्या आहेत
  • शे होपलाही १७ धावांसह ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण करता येणार आहेत
  • सुनील नरीनने ९७ धावा केल्यास तो आयपीएलमध्ये १५०० धावा पूर्ण करेल.  

मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात १५ धावा चोपल्या गेल्या आणि त्यात पृथ्वी शॉ याने तीन सुरेख चौकार खेचले होते. पण, वैभव अरोराने दुसऱ्या षटकात पृथ्वीला ( १३) माघारी पाठवले. जॅक फ्रेझर-मॅकगर्कने हात मोकळे करण्यास सुरुवात केलीच होती, तर त्याला स्टार्कने बाद केले. मॅकगर्क १२ धावांवर वेंकटेश अय्यरच्या हाती झेल देऊन परतला. वैभव अरोराने अप्रतिम इनस्विंग चेंडू टाकून शे होपचा ( ६) त्रिफळा उडवला. ३७ धावांत आघाडीचे ३ फलंदाज दिल्लीने गमावले. 

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सपृथ्वी शॉ