शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणूक झाल्यास देशात पुन्हा मोदी सरकार येणार, भाजपाला एवढ्या जागा मिळणार

By बाळकृष्ण परब | Updated: January 21, 2021 23:50 IST

Narendra Modi News : आज प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार आजच्या घडीला देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, अशी शक्यता आहे.

ठळक मुद्देआज तक या हिंदी वृत्तवाहिनीने कार्वी इनसाइड्स लिमिटेडसोबत केलेल्या या सर्व्हेनुसार देशात आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपाला पुन्हा एकदा स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यतामात्र २०१९ च्या तुलनेत भाजपा आणि एनडीएच्या जागा घटण्याची शक्यता मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था ही २०१९ प्रमाणेच राहणार

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले कोरोना संकट आणि केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन यामुळे मोदी सरकारविरोधात असंतोष वाढला आहे. अशा परिस्थितीत या असंतोषाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला बसेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार आजच्या घडीला देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, अशी शक्यता आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था ही २०१९ प्रमाणेच राहणार आहे.आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने कार्वी इनसाइड्स लिमिटेडसोबत केलेल्या या सर्व्हेनुसार देशात आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपाला पुन्हा एकदा स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र २०१९ च्या तुलनेत भाजपा आणि एनडीएच्या जागा घटण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळतील. तर भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ मिळतील असा अंदाज आहे. २०१९ च्या तुलनेत एनडीएच्या ३२ जागा तर भाजपाच्या १२ जागा घटण्याची शक्यता आहे.या सर्व्हेनुसार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा आणि काँग्रेसला १९ टक्के मतांसह ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला २०१९ च्या तुलनेत एका जागेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यूपीए आणि एनडीएमध्ये समावेश नसलेल्या अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.भाजपा आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त इतर पक्षांना मिळून ४४ टक्के मतांसह २०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांमध्ये यूपीए, एनडीएमधील आणि या दोघांबाहेरील पक्षांचा समावेश आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक