शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र सैनिकांना दिलं आश्वासन

By प्रविण मरगळे | Updated: January 20, 2021 18:12 IST

शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या मनसेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधक यांच्या तुलनेत मनसेला मिळालेलं यश कमी असलं तरी नोंद घेण्यासारखं आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदनग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई  - राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढवा, असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले होते, त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उमेदवार उभे केले, स्थानिक पॅनेल उभं करून ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली, कार्यकर्त्यांच्या बळावर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवलं, त्यामुळे या कार्यकर्त्यांचे कौतुक राज ठाकरेंनी केले आहे.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या तुलनेत मनसेला मिळालेलं यश कमी असलं तरी नोंद घेण्यासारखं आहे. शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या मनसेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या अशी सूचना राज यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचं यश

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत. अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात शिरपूर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ७ पैकी ६ सदस्य निवडून आले आहेत.

रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी ७ पैकी ५ जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. याठिकाणी ९ पैकी ७ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने ७ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत.  रायगडच्या जोहे येथे मनसेचा १ उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. तर यवतमाळच्या वणी तालुक्यात मनसेने तब्बल १५ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेgram panchayatग्राम पंचायत