शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण' 

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 1:33 PM

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; राजकारण तापलं

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीनं ताब्यात घेतलं असून धाडसत्र सुरूच आहे. सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप सरकारमधील नेत्यांनी केला. 'अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,' असं भुजबळ म्हणाले.'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'केंद्र सरकार किंवा भाजपच्या कारवाईविरोधात बोलणं म्हणजे कारवाई ओढवून घेणं अशी सध्याची परिस्थिती असल्याचं भुजबळांनी म्हटलं. 'विरोधी सूर उमटला की लगेच कारवाई होते. राज्यात आम्ही सत्ता स्थापन केली, तेव्हाच अशा प्रकारच्या अडचणी येणार याची कल्पना होती,' असं ते पुढे म्हणाले. 'ईडी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं आहे. केंद्राकडून केवळ आणि केवळ सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे,' असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या टीकेला भाजपचं उत्तरकाही चुकीचं केलं नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही पुरावे असतील म्हणून ईडीनं कारवाई केली असेल. काही ठोस पुरावे हाती असल्याशिवाय ईडी कारवाई करत नाही, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 'राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्यावी. ...म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाणआम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमककितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचं पथक; सेनेचे इतरही नेते रडारवर?प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकChhagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत