शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 19:08 IST

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. 

ठळक मुद्देपार्थ पवारांचा विषय पवार कुटुंबीयांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सध्या राजकारण सुरु आहे. याप्रकरणी भाजपा नेते नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, यावर भाजपाकडून कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, "मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. बिहार आणि मुंबई पोलिसांची तुलना होऊ शकत नाही. अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करु नये", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याचबरोबर, महाविकास आघाडीच्या कारभाराचे विश्लेषण करायची ही वेळ नाही. मात्र सरकारने कारभार नीट चालवावा. त्यांच्यात अंतर्गत मोठ्या प्रमाणात भांडण सुरु आहे. सरकारमध्ये नेमके काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. मात्र बदल्यासंदर्भात अनाकलनीय सुरु आहे. जे ऐकायला मिळते ते भयंकर आहे. राज्याच्या डिजी यांनी चुकीच्या बदल्या करणार नाही, आता बदल्या करण्याची गरज नव्हती असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याशिवाय, गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर फटकारले होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पार्थ पवारांचा विषय पवार कुटुंबीयांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे