शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अजितदादा... हे असं वागणं बरं नव्हं; प्रचारात कायदा पायदळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:22 IST

व्यापाऱ्यांवर गुन्हे, नेत्यांना मात्र मुभा

पंढरपूर : गेल्या २०दिवसांत पंढरपूर तालुक्यात तब्बल ११०० रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, गेल्या आठवड्यात येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी जमविल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये कोरोनाची कसलीच भीती नसल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. किमान उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तरी अशा नियमबाह्य गर्दीत भाषण ठोकण्यापूर्वी विचार करायला हवा होता. चार ग्राहक एकत्र येऊ नयेत म्हणून आमच्या पोटावर पाय देणाऱ्या प्रशासनाला राजकीय नेत्यांची भाऊगर्दी कशी काय चालते, असा सवालही जिल्ह्यातील संतप्त व्यापारी विचारू लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला गुरुवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी घेणारे राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि १८८ अन्वये गुन्हा नोंदला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत गर्दी केल्याने आठ दिवसांत हा तिसरा गुन्हा आहे. मतदान १७ एप्रिल रोजी होणार असून रोजच प्रचाराचा धुराळा उडत आहे.सोशल मीडियावर टीकाअजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या गर्दी होतच असते. परंतु सध्याच्या कोरोना काळात मनात आणले असते तर अजितदादा हे गर्दी टाळू शकले असते. सध्या राज्य सरकारने विवाहासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींचे बंधन घालून दिले आहे. अशा सामाजिक अंतराचे नियम पाळण्याच्या दिवसामध्ये ही गर्दी केल्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.पंढरपूर तालुक्यात गेल्या २० दिवसांत १ हजार १७० पॉझिटिव्ह रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बैठका, सभा यांमुळे संसर्ग वाढत असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. २६ मार्चनंतर पंढरपुरात रुग्ण वाढत गेले. ४ एप्रिलनंतर ही वाढ वेगाने होताना दिसत आहे.पंढरपूरने गमावले अनेक नेते : पंढरपूर तालुक्याने आतापर्यंत मोठे राजकीय नेते कोरोनामुळे गमावले आहेत. आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांच्यासह अनेकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सध्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातून एका नेत्यालाही बाधा झाली आहे. अशातही प्रचारसभांना विनामास्क मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या