शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

’भाजपाने बिहारच्या विजयाचा आनंद पुढची चार वर्षे साजरा करावा’ शिवसेनेचा सामनामधून टोला

By बाळकृष्ण परब | Updated: November 18, 2020 08:02 IST

Shiv Sena News : बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपा नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल. सोबतच महाराष्ट्रातही शांतता राहील

ठळक मुद्देनितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक, पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल का हा प्रश्नच आहेमहाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहेआजपासून वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात पचका झाला व ते दु:ख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारमध्ये असतात

मुंबई - बिहार विधानसभा निवडणूक आणि नितीश कुमार यांच्या शपथविधीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून भाजपाला जोरदार टोले लगावले आहेत. नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक, पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल का हा प्रश्नच आहे. बिहारमध्ये ज्यांनी चमकदार कामगिरी केली ते तेजस्वी यादव हे विरोधी पक्षात बसले आहेत. महाराष्ट्रातही सगळ्यात मोठा पक्ष हा विरोधात बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब बिहारमध्ये पडले आहे. पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपाने पुढची चार वर्षे साजरा करत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपा नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल. सोबतच महाराष्ट्रातही शांतता राहील, असा टोला सामनामधून लगावण्यात आला.बिहारमध्ये दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखाली पुढचे दिवस ढकलावे लागतील. या चिंतेने नितीश कुमारांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले आहे. नितीश कुमार सलग सातवेळा अशाच तडजोडी करून मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, भाजपातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला होता, असे सांगितले. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला नव्हता असे फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दु:ख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारमध्ये असतात, असा चिमटाही सामनामधून काढण्यात आला आहे.बिहारमधील सरकार संपूर्ण पाच वर्षे चालेल असा आत्मविश्वास भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून, ते फार काळ चालणार नाही, अशी खदखद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या ढोंगास काय म्हणावे. बिहारमधील भाजपा-जेडीयू सरकारचे बहुमत हे केवळ २-३ आमदारांचे आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तीसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले हे ठीक, पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल का हा प्रश्नच आहे, असा चिमटाही सामनामधून काढण्यात आला आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitish Kumarनितीश कुमार