शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भाजपवाल्यानों.! बारामती आमची आहे..तिच्यावर वाकडी नजर नको : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 9:47 PM

भाजपवाल्यांना जो काही गोंधळ घालायचा तो त्यांनी नागपूर आणि गोध्रामध्ये घालावा..

ठळक मुद्देगेल्या 50 वर्षात राज्याचे राजकारण आमच्या कुटुंबाभोवती

केडगाव-  भाजपवाल्यांना जो काही गोंधळ घालायचा तो त्यांनी नागपूर आणि गोध्रामध्ये घालावा..बारामती आमची आहे.तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहु नका. असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला दिला आहे.         राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार सुळे यांचा यवत व केडगाव येथे पदयात्रा व सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई देवकाते, जिल्हा परिषदेच्या सभापती राणी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, आनंद थोरात, वैशाली नागवडे, गणेश कदम, दौलत ठोंबरे, सुभाष यादव, रामदास दोरगे, विकास खळदकर, भाऊसाहेब दोरगे आदी उपस्थित होते.      सुळे म्हणाल्या,बारामती आमची आहे.तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहु नका. निवडणुकीत मतदारांनी नेहमी मेरीटवर मतदान करावे. नातीगोती नंतर पाहावीत.सुनेत्रा अजित पवार यांनी भाजपा उमेदवार कांचन कुल यांचा विवाह आमदार राहुल कुल यांच्याशी घडवुन आणला.या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या नात्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे 4 उमेदवार खासदार होणार आहे.त्यामुळे दिल्लीमध्ये सुनेत्रा वहिनींचे वजन वाढणार आहे.आदर्श संसदपटू पुरस्कार मी विरोधात असताना मिळाला. विरोध फक्त निवडणुकीपुरता असावा. पण सरकारने चुकीचे धोरण आखले की त्याला विरोध करणार. मतदार संघातील जनतेला कधी विसरायचे नाही ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही. गेल्या 50 वर्षात राज्याचे राजकारण आमच्या कुटुंबाभोवती फिरत आहे. वयोश्री व कुपोषणात बारामती लोकसभा मतदार संघाचे कौतुकास्पद काम झाले आहे.       

परीक्षेपुर्वी अभ्यास करायचा ही शिकवण आईकडूनयावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की समोर उमेदवार कोण आहे ?याची काळजी नाही. प्रत्येक परीक्षेला बसण्यापूर्वी अभ्यास कसा करायचा व तयारी कशी करायची याची शिकवण मला माझ्या आईनी दिली आहे. त्यामुळे माझी परीक्षेच्या दृष्टीने पूर्ण तयारी झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहा