शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सापळा रचून पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला घेतलं ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 10:57 IST

पिंपरी: शहरात सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून त्याच्याकडून दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी ही ...

पिंपरी: शहरात सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून त्याच्याकडून दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. प्रताप उर्फ बाळ्या हनमंत पवार (वय २९, रा. पिरंगुट, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. लातूर येथील गुन्ह्यातील फरार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार बावधन येथे येणार असून त्याच्या जवळ पिस्तूल आहे, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून बावधन रोड, पुणे येथून आरोपी पवार याला पकडले. त्याच्या ताब्यातून ४० हजार ४०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोज जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

आरोपीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडी दरम्यान पोलिसांनी चौकशी केली. तसेच आरोपी पवार याच्याकडून ४० हजार २०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे आणखी एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीकडून एकूण ८० हजार ६०० रुपये किमतीचे दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. आरोपी पवार हा पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात यापूर्वी दरोड्याचे दोन, अग्निशस्त्राचा एक असे गुन्हे दाखल आहेत. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दाखल खुनाचा प्रयत्न व जामखेड पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात तो सात महिन्यांपासून फरार आहे.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकिर जिनेडी, सहायक उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस कर्मचारी सुनील कानगुडे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, संदीप पाटील, शैलेश मगर, किरण काटकर, सुधीर डोळस, अशोक गारगोटे, निशांत काळे, गणेश गिरीगोसावी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी