शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चार अपघातांमध्ये तीन जण ठार; दोन जखमी

By admin | Updated: August 3, 2015 04:19 IST

इंद्रायणीनगर आणि पिंपरी, चिंचवड येथे शनिवार आणि रविवारी झालेल्या चार अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दुचाकीला

पिंपरी : इंद्रायणीनगर आणि पिंपरी, चिंचवड येथे शनिवार आणि रविवारी झालेल्या चार अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या वाघोलीतील अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला. मृतात संगीता शिवाजी घोडके (वय ४३), श्रेयस शिवाजी घोडके (वय ११, दोघे रा. वाघोली) या मायलेकांचा, तर ट्रकने ठोकरल्याने चिंचवड स्टेशन येथे गंगाराम यशवंत भोपवे (वय ५६, रा. रुपीनगर) यांचा, तर दोन दुचाकी धडकून जावेद जब्बार आलम सय्यद (वय १८, रा. ढवळे वस्ती, मुंढवा) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दारूच्या नशेतील एकाने दोन दुचाकींना धडकून दोघेजण जखमी केले. दोन दुचाकींची धडक पुणे -मुंबई रस्त्यावरील चिंचवड स्टेशन येथील मेगा मार्टसमोर शनिवारी दुपारी बाराला अहमद आलम हा भरधाव जात असताना समोरून जाणाऱ्या मोटारीला ओव्हरटेक करून चुकीच्या दिशेने जाताना रोहित पालांडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे सय्यदच्या मागे बसलेल्या जावेद आलम गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रोहित पालांडे (वय २४, रा. चतु:शृंगी) याने फिर्याद दिली आहे. अहमद समीर आलम (वय २०, रा. ढवळे वस्ती, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केली आहे.चालकाला पाठलाग करून पकडलेपिंपरी खराळवाडी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या विरुद्ध बाजूला रविवारी दुपारी दोन दुचाकींना धडक देऊन पळून जाणाऱ्या एका मोटारचालकाला एका नागरिकाने पाठलाग करून पकडले. मोटारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. एका मोटारीने (एमएच १४ टी २७४९) दोन दुचाकींना ठोकरले. दोन्ही दुचाकीवरून जात असलेल्या चौघांपैकी दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, धडक देणाऱ्या मोटार चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तेथून जात असलेल्या उमेश पटेल यांनी या मोटारचालकाचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने नागरिक व पोलिसांशी अरेरावीही केली. दुचाकीस्वार ठारपिंपरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर चिंचवड स्टेशन चौकात झाला. भरधाव वेगातील ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार गंगाराम यशवंत भोपवे (वय ५६, रा. रुपीनगर) यांचा मृत्यू झाला. राधेशाम धरमसिंह शिरोई (वय ४५, रा. जगदपूर, उत्तरप्रदेश) या चालकाला अटक करण्यात आली आहे.निगडीवरून पुण्याकडून जाताना दुपारी पावणेएकच्या सुमारास चिंचवड स्टेशन चौकात ट्रकची दुचाकीला समोरून धडक बसली. (प्रतिनिधी)