शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीवर मात करत सावित्रीच्या लेकीची ८७ अभ्यासक्रमांसह नऊ विश्वविक्रमांत नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:59 IST

- जया उभे यांचे नऊ भाषांवर प्रभुत्व; महिलांमध्ये सर्वाधिक अभ्यासक्रम पूर्ण करत जागतिक पातळीवर उमटवला ठसा

- गोविंद बर्गे

पिंपरी : खेळण्या-बागडण्याच्या वयात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी केलेले मजुरीचे काम, वडिलांच्या आजारपणासाठी झालेला खर्च, घरची हलाखीची परिस्थिती यावर मात करत तब्बल ८७ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करत नऊ विश्वविक्रमांना गवसणी घालण्याची किमया खराळवाडी येथील सावित्रीच्या लेकीने केली आहे. ॲड. जया बाळकृष्ण उभे असे त्यांचे नाव आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, फारसी, उर्दू, कन्नड, गुजराती अशा नऊ भाषांवर प्रभुत्व, हे ३८वर्षीय जया यांचे वैशिष्ट्य. जागतिक पातळीवर महिलांमध्ये सर्वांत जास्त शैक्षणिक अभ्यासक्रम मिळविण्याचे स्वप्नही त्यांनी पूर्ण केले आहे. हे शिक्षण त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापाठीतून पूर्ण केले आहे. त्यांनी बालपणापासून गरिबीचे असह्य चटके सहन केले. वडील प्लंबर, तर आई गृहिणी. जया सातवीत असताना वडिलांच्या मधुमेहाने डोके वर काढले. त्यांना डायलिसिस करावे लागत होते. अशा कठीणप्रसंगी कोणाकडूनही आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे लहानपणी मजुरी करण्याची वेळ आली. पुढे मधुमेहाने वडिलांचे निधन झाले; परंतु आईने शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिले.सध्या त्या पुणे विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून एम.ए.चे (लोकप्रशासन) शिक्षण घेत आहेत; तसेच पैठण येथील वारकरी संप्रदायाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेचे लेखन सुरू असून हार्मोनियमचेही शिक्षण घेत आहेत. सुमारे २५० पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. विश्वविक्रम नोंदवणाऱ्या नऊ संस्थांनी त्यांची नोंद केली आहे.

एकूण ८६ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्णडॉक्टरेट व डी.लिट. पदवी

बी.ए., एलएल.बी., एलएल.एम.

११ विषयांमध्ये एम.ए.७ पदविका (डिप्लोमा)

६४ प्रमाणपत्र अभ्यासक्रम

नियमित व दूरस्थ पद्धतीने शिक्षण पूर्ण

सध्या पुढील शिक्षण सुरू

 अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेत विविध ८७ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केले. या यशात आईचा सिंहाचा वाटा आहे. हे यश केवळ आईमुळेच मला मिळाले, दुर्दैवाने हे यश पाहायला आज ती सोबत नाही, याची खंत वाटते. - ॲड. जया उभे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Savitri's Daughter Conquers Poverty, Achieves Nine World Records with 87 Courses

Web Summary : Jaya Ubhe overcame poverty, completing 87 courses and achieving nine world records. Despite hardship, she mastered nine languages and pursued extensive education through various universities. Her mother's support was crucial in her success.
टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड