Pune plastic price hike : प्लास्टिक महागले, सारेच होरपळले; दूध वितरकही दरवाढीत कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:38 IST2026-04-17T13:37:04+5:302026-04-17T13:38:55+5:30

- आखातातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतवाढीचा बसतोय तडाखा, पिशव्यांच्या दरात साठ टक्के वाढ; प्लास्टिकला स्वस्त आणि प्रभावी पर्याय नसल्याचा परिणाम  

pune news plastic became expensive, everyone was shocked; Milk distributors also collapsed due to price hike | Pune plastic price hike : प्लास्टिक महागले, सारेच होरपळले; दूध वितरकही दरवाढीत कोलमडले

Pune plastic price hike : प्लास्टिक महागले, सारेच होरपळले; दूध वितरकही दरवाढीत कोलमडले

- आकाश झगडे

पिंपरी : आखातातील युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा तडाखा आता जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीला बसू लागला आहे. प्रामुख्याने पॅकेजिंग आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी अनिवार्य असलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या दरात गेल्या काही दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. प्लास्टिकला कोणताही स्वस्त आणि प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्याने, ही दरवाढ व्यवसायाचे कंबरडे मोडणारी ठरत आहे.

महाराष्ट्र सरकारने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी, दूध, औषधे आणि उत्पादनाच्या ठिकाणी पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकला विशिष्ट अटींनुसार सवलत दिली आहे; मात्र, सध्या कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे या सर्व क्षेत्रांच्या खर्चात मोठी वाढ झाली असल्याचे व्यवसासिक सांगतात.

अनिवार्य प्लास्टिक पिशव्यांचा वापर कोठे होतो ?

दूध, दुग्धजन्य पदार्थ अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग वैद्यकीय, औषध निर्माण बायो-मेडिकल वेस्ट कृषी, नर्सरी, खते-बियाणे ई-कॉमर्स, कुरिअर हॉटेल, केटरिंग, औद्योगिक उत्पादने

प्लास्टिक पिशव्या महागण्याची मुख्य कारणे

प्लास्टिकच्या पिशव्या प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या उपउत्पादनांपासून तयार केल्या जातात. आंतरराष्ट्रीय तणावामुळे प्लास्टिक ग्रॅन्युअल्स तयार करणाऱ्या कंपन्यांना कच्च्या मालाची टंचाई जाणवत आहे. प्लास्टिक रोलचा दर ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यातच व्यावसायिक गॅस आणि वीज महागल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.

पर्यायांचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनता

दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी प्लास्टिक पिशव्यांना सध्यातरी कोणताही स्वस्त आणि टिकाऊ पर्याय उपलब्ध नाही. काचेच्या बाटल्या किंवा पेपर कार्टन्सचा खर्च प्लास्टिकच्या तुलनेत खूप जास्त आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांमुळे जाड प्लास्टिक वापरणे बंधनकारक आहे. 

पॅकेजिंग मटेरियलमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. प्लास्टिक आणि इंधन दरवाढीमुळे आमचा नफा संपला आहे. सरकारने पॅकेजिंग मटेरियलवरील कर कमी करावा किंवा दूध दरात त्या प्रमाणात सुधारणा करावी, अन्यथा दूध वितरण करणे कठीण होईल. - विठ्ठल मोरे, दुग्ध वितरक व व्यावसायिक  

Web Title : पुणे प्लास्टिक मूल्य वृद्धि: लागत बढ़ी, दूध वितरक महंगाई से परेशान

Web Summary : कच्चे तेल की लागत बढ़ने से प्लास्टिक की कीमत दोगुनी हो गई, जिससे आवश्यक पैकेजिंग प्रभावित हुई। दूध वितरक चुनौतियों का सामना कर रहे हैं, कर कटौती या मूल्य संशोधन का आग्रह कर रहे हैं।

Web Title : Pune Plastic Price Hike: Costs Soar, Milk Distributors Struggle with Inflation

Web Summary : Plastic price doubles due to rising crude oil costs, impacting essential packaging. Milk distributors face challenges, urging tax cuts or price revisions amid rising expenses for mandatory packaging.