शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी नव्हे, विष पाजतेय..! नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:02 IST

Pimpri-Chinchwad : पवना नदीतील रासायनिक पाण्यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

पिंपरी : शहरातील नागरिकांना कमी दाबाने आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. जेथून पाणी उचलतो, तेथे पवना नदी मृतावस्थेत आहे. पाण्याची चाचणी केली असता ते रासायनिक पाणी असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रक्रिया करून ते पाणी किती शुद्ध होणार? त्यामुळे महापालिका नागरिकांना पाणी नाही तर विष पाजत असल्याचा आरोप नगरसेवकांनी मंगळवारी (दि. ५) सर्वसाधारण सभेत केला.

उन्हाळा सुरू असून शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शिंदेसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे म्हणाले की, पवना नदीत सांडपाणी सोडण्यात येत आहे. रावेत बंधाऱ्याचे पाणी चाचणीसाठी घेऊन प्रयोगशाळात चाचणीसाठी देणार होतो. मात्र, त्यांनी पाण्याचे नमुने घेतले नाहीत. खासदारांचे पत्र दिले, तेव्हा एका प्रयोगशाळेने चाचणी केली. हे पाणी विषारी असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.

संगीता ताम्हाणे म्हणाल्या की, शहरात पाण्याची टंचाई आहे. पाण्यात अळ्या असल्याचे वारंवार अधिकाऱ्यांना सांगितले आहे. श्रुती वाकडकर म्हणाल्या की, कमी दाबाने, अनियमित आणि अशुद्ध पाणी येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक टँकरने पाणी खरेदी करीत आहेत.

सुलभा उबाळे म्हणाल्या की, आपण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहोत. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे पाप केले आहे. पाण्यासाठी खर्च करा. शैलजा मोरे, कुशाग्र कदम, निखिल बोऱ्हाडे, संदीप वाघेरे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले.

...तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही

जोपर्यंत पवना बंद जलवाहिनीचे काम होणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नसल्याचा सूर यावेळी नगरसेवकांनी आळवला. त्यासाठी शहरातील पाच आमदार, एक खासदार आणि १२८ नगरसेवकांनी प्रयत्न करावेत. पुणे महापालिका भामा-आसखेडचे पाणी आपल्यानंतर काम सुरू करून नेत असेल तर, आपल्याला का जमत नाही, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Corporation accused of supplying polluted water, corporators confront administration.

Web Summary : Corporators allege Pimpri-Chinchwad is supplying polluted water, not potable water. The Pavana River is in critical condition, with test results confirming chemical contamination. Water scarcity exacerbates the issue, with residents forced to buy water due to irregular and impure supply.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण