शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
2
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
3
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
4
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
5
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
6
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
7
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
8
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
9
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
10
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
11
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
12
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
13
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
14
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
15
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
16
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
17
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
18
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
19
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
20
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad tax collection : पिंपरी-चिंचवड पालिकेच्या करसंकलनात यंदा वाकड झोन 'नंबर वन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:18 IST

- करसंकलनात १८ झोनमध्ये वाकड अव्वल; थेरगाव, चिंचवडचीही दमदार कामगिरी - प्रमुख झोनची कोट्यवधींची वसुली : अभय योजना, थकबाकीसाठी पाठपुरावा तसेच थकबाकीदारांवरील कारवाईचा परिणाम; ६ लाख २७ हजार ७९० मालमत्ताधारकांनी भरला कर  

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ झोनपैकी वाकड विभागीय कार्यालयाने सर्वाधिक ११७ कोटी १८ लाख ३८ हजार ९११ रुपयांची करवसुलीकरत अव्वल स्थान पटकावले. अभय योजना, थकबाकीसाठी पाठपुरावा तसेच कारवाई आणि नागरिकांना दिलेल्या सुलभ सुविधांमुळे वाकड झोनने यंदा सर्वाधिक महसूल मिळवला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ९४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करून पुन्हा एकदा उच्चांक प्रस्थापित केला आहे. महापालिकेने दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार केला. शहरातील सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांपैकी ६ लाख २७ हजार ७९० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. गतवर्षी कर संकलन विभागाने ९४० कोटी रुपयांचा कर वसूल केला होता. यंदा महापालिका निवडणुकीच्या कामात विभागातील कर्मचारी तब्बल तीन महिने गुंतले होते. त्यामुळे वसुलीवर काही प्रमाणात परिणाम झाला. अन्यथा यंदा एक हजार कोटींचा टप्पाही पार करता आला असते, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

------

चिंचवड मतदारसंघातून अधिक वसुली

चिंचवड मतदारसंघातून वाकडनंतर थेरगाव झोनने ९७ कोटी ६१ लाख ३३ हजार ९९३ रुपये, तर चिंचवड झोनने ७७ कोटी ३४ लाख ६८ हजार ८२४ रुपये कर वसूल केला. किवळे झोनने ६४ कोटी ८९ लाख ७८ हजार ७१९ रुपये वसुली केली. तर भोसरी मतदारसंघातून चिखली झोनने ६७ कोटी ६० लाख ८५ हजार ५९१ रुपये, भोसरी झोनने ६३ कोटी ६९ लाख ८२ हजार ४५६ रुपये, तर मोशी झोनने ६२ कोटी ५८ लाख ३० हजार ७८६ रुपये कर वसूल करत आघाडीच्या झोनमध्ये स्थान मिळवले. कर संकलन विभागाच्या एकूण विक्रमी कामगिरीत चिंचवड मतदारसंघातील झोनचा प्रमुख झोनचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-----------

अभय योजनेतून ४५ कोटी १३ लाखांची सवलत

महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. १ ते ३१ मार्च या कालावधीत ८३ हजार ४७० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. ३१ दिवसांत १९७ कोटी १८ लाख रुपयांचा कर वसूल झाला. या योजनेंतर्गत नागरिकांना ४५ कोटी १३ लाख रुपयांची सवलत मिळाली.

---------

कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी

औद्योगिक : ४ हजार ७८३

निवासी : ५ लाख ५२ हजार ४२

बिगरनिवासी : ५२ हजार २११

मिश्र :१३ हजार ६७४

मोकळी जमीन : ५ हजार ४९

इतर : ३१

एकूण : ६ लाख २७ हजार ७९०

-------

असा आला रुपया...

ऑनलाइन : ७०६ कोटी ७२ लाख

रोख : ८३ कोटी ८८ लाख

धनादेशाद्वारे : ११० कोटी ५२ लाख

ईडीसी : ६ लाख

डीडी : ७ कोटी ९ लाख

 महापालिकेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे साडेनऊशे कोटींचा टप्पा पार झाला. या वर्षासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले जाईल. अभय योजना लागू करण्याबाबत पुनर्विचार करणे सुरू आहे.  – तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Wakad Zone Tops Pimpri-Chinchwad Municipal Corporation's Tax Collection This Year

Web Summary : Wakad zone led Pimpri-Chinchwad's tax collection with ₹117.18 crore, aided by amnesty schemes. The corporation collected ₹947 crore property tax, nearly reaching ₹1000 crore despite election duties. Chinchwad constituency zones contributed significantly. An amnesty scheme provided ₹45.13 crore relief to 83,470 defaulters.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रTaxकर