शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

शहराला पुरवलं जाणारं पाणी ‘सुरक्षित’ आहे का? पवना नदीपात्रातील घाण पाहून नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:52 IST

- पुनावळेतील राम मंदिर घाटाजवळचा धक्कादायक प्रकार : प्लास्टिक पिशव्यांचाही खच; महापालिकेकडून अज्ञातांविरोधात गुन्हा; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू; दोषींना शोधण्याचे प्रयत्न

रावेत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीपात्रात पुनावळे येथील राम मंदिर दशक्रिया घाटाजवळ जनावरांचे मांस आणि प्लास्टिक पिशव्यांचा खच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये कचरा आणि मांस फेकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात महापालिकेने रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरवासीयांना नेमके कोणत्या दर्जाचे पाणी प्यावे लागत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

महापालिका मावळ तालुक्यातील पवना धरणातून दररोज सुमारे ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. धरणातील पाणी पवना नदीमार्गे रावेत येथील बंधाऱ्यापर्यंत आणले जाते. त्यानंतर हे अशुद्ध पाणी निगडी-प्राधिकरण येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहराच्या विविध भागांना पुरविले जाते. मात्र नदीपात्रातच मोठ्या प्रमाणात मांस, चरबी आणि प्लास्टिक पिशव्या टाकल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पवना नदीपात्र आणि रावेत बंधाऱ्यात घाण टाकली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सातत्याने येत होत्या. विशेषतः काही मांसविक्रेते उरलेले मांस, चरबी आणि अन्य टाकाऊ अवशेष पुनावळे गावाजवळील पुलावरून थेट नदीत फेकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने परिसराची पाहणी केली. या पाहणीत राम मंदिर घाटाजवळ तब्बल १२ पिशव्यांमध्ये जनावरांचे मांस आढळून आले.

याप्रकरणी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता पंकज धेंडे यांनी रावेत पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.११) फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून दोषींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

२३ एप्रिललाही सापडल्या होत्या ३० पिशव्या

यापूर्वी २३ एप्रिल रोजीही नदीपात्रात ३० पिशव्या आढळून आल्या होत्या. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून नदी परिसरात गस्त घालण्यात येते. वेळोवेळी दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, तरीही नदी प्रदूषित करण्याचे प्रकार थांबत नाहीत.

पवना नदीपात्रात पुनावळे परिसरात वारंवार प्राण्यांचे अवशेष आणि मांस टाकले जात असल्याचा मुद्दा मी सभागृहात गंभीरपणे मांडला होता. त्यानंतर स्वतः महापौरांनी नदीपात्राची पाहणी करून पर्यावरण विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात ठोस कारवाई करण्याऐवजी पर्यावरण विभाग केवळ अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून जबाबदारी झटकत आहे. - रेश्मा भुजबळ, नगरसेविका  

 

पवना नदीपात्रात प्राण्यांचे अवशेष आणि मांस टाकण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, याबाबत संबंधितांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. संवेदनशील ठिकाणी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.  - पंकज धेंडे, उपअभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Meat found in Pavana River raises water supply concerns.

Web Summary : Animal meat and plastic bags were discovered in the Pavana River, a water source for the city. The dumping raises concerns about water quality. Authorities have filed a police complaint and are investigating the incident to identify and punish those responsible for polluting the river.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड