शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कंत्राटी कामगार बोनसविना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 1:50 AM

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील उद्योग ज्या कंत्राटी कामगारांच्या बळावर चालतात, त्या कंत्राटी कामगारांना अनेक कंपन्यांकडून दिवाळीत बोनसच दिला जात नाही.

- मंगेश पांडे पिंपरी : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील उद्योग ज्या कंत्राटी कामगारांच्या बळावर चालतात, त्या कंत्राटी कामगारांना अनेक कंपन्यांकडून दिवाळीत बोनसच दिला जात नाही. त्यामुळे शहरातील बोटावर मोजण्याइतक्या नामांकित कंपन्या सोडल्यास कंत्राटी कामगारांची दिवाळी बोनसविना जाण्याची शक्यता आहे. बोनसच कामगारांच्या हातात न पडल्याने लाखोंची उलाढाल होत असलेल्या बाजापेठेतील खरेदीवरही मोठ्या परिणाम होणार आहे.दिवाळी सणात नवीन वस्तूंची खरेदी करण्यासह कुटुंबीयांची हौसमौज पुरी केली जाते. यासाठी कामगारवर्ग दिवाळीत कंपनीकडून मिळणाऱ्या बोनसची वाट पाहतो. मात्र, औद्योगिकनगरीतील काही निवडक मोठ्या कंपन्या वगळता इतर छोट्या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांना बोनसच दिला जात नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे.शहरात २० मोठे, ४५० ते ५०० मध्यम, चार ते साडेचार हजार लघू आणि सुमारे पाच हजार सूक्ष्म उद्योग आहेत. त्यामध्ये हजारो कामगार काम करतात. यातील एकूण कामगारांपैकी ८० टक्के कामगार कंत्राटी आहेत. या कंत्राटी कामगारांच्या बळावरच ही उद्योगनगरी चालते. मात्र, त्यांना कंपनीकडून, ठेकेदारांकडून पुरेशा सुविधा पुरविल्या जात नाहीत. दिवाळीत देण्यात येणाºया बोनसबाबतचीही अशीच स्थिती आहे. अनेक ठेकेदारांकडून कामगारांना बोनसच देण्याबाबत टोलवाटोलवी केली जाते.दरम्यान, कामगारांना बोनस देण्यासाठीची रक्कम कंपनीकडून ठेकेदाराला दिली जाते. मात्र, ती कामगारांपर्यंत पोहोचतच नाही. नेहमीप्रमाणे महिन्याचा जो पगार असेल तोच कामगाराच्या हातावर टेकविला जातो. यामुळे दिवाळीनिमित्त कपडे खरेदीसह विविध वस्तू खरेदीचे केलेले नियोजन कोलमडते. मात्र, याचे कंपनी मालकाचे अथवा ठेकेदारालाही गांभीर्य नसल्याने कामगार वर्गात नाराजीचा सूर आहे.अंमलबजावणीची औपचारिकताउद्योगनगरीतील मोठ्या कंपन्यांतील कायमस्वरुपी कामगारांनाच बोनस दिला जातो. पूर्वी हा बोनस कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून दिला जायचा. यामुळे कामगारांना अधिकचा बोनस मिळायचा. आता मात्र, बोनस अ‍ॅक्टची अंमलबजावणी केली आहे, हे दाखविण्यासाठी जेवढा बोनस होईल, तेवढाच कामगारांच्या हातावर टेकविला जात आहे.बोनस म्हणजे महिन्याला हातात येणाºया पगाराच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळते. यामुळे बाजारपेठेतील खरेदीवर भर दिला जातो. कपडे खरेदीसह विविध वस्तू खरेदीचे नियोजन केले जाते. खरेदी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असते. मात्र, बोनसच मिळत नसल्याने कामगार वर्ग खरेदीसाठीही बाजारपेठेकडे वळला नाही. यामुळे बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.ज्या कामगारांच्या हातावर ही उद्योगनगरी चालते. अशा कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देणे आवश्यक असतानाही दिला जात नाही. गोरगरीब व कंत्राटी कामगारांच्या बोनसची रक्कम ठेकेदारच गिळंकृत करतात . त्यामुळे या कंत्राटी कामगारांचा दिवाळीत भ्रमनिरस होत असून, हा एकप्रकारचा अन्याय आहे. कायम कामगारांनाही बोनसची ठरावीकच रक्कम दिली जात आहे.- यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडीकंपनीकडील कामगार असो अथवा कंत्राटी कामगार असो जो कामगार बोनसच्या नियमात बसतो. अशा प्रत्येक कामगाराला बोनस द्यायलाच हवा. कंपनी मालकांसह ठेकेदारांनीही त्याची अंमलबजावणी करायला हवी.- संदीप बेलसरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDiwaliदिवाळी