शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी

By विश्वास मोरे | Updated: May 13, 2025 20:23 IST

गेल्यावर्षी ९७.९५ टक्के निकाल लागला होता, गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला.  त्यात शहराचा निकाल  ९७. ९७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी ९७.९५ टक्के निकाल लागला होता. गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे. तर निकालात मुलींचा निकाल ९८.४२ टक्के लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडच्या पोरीचं हुशार असल्याचे सिद्ध झाले आहे. शहरात मुले पिछाडीवर 

पिंपरी चिंचवड शहरातून १० हजार ३३२ मुले, ९५८५ मुली असे एकूण १९ हजार ९९७ विद्यार्थी यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार २९६  मुले, ९५७२ मुली अशा एकूण १९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १० हजार ०४४ मुले, ९४२२ मुली अशा एकूण १९ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये शहराचा एकूण निकाल ९७.९७  टक्के लागला आहे. तर त्यात मुले ९७. ५५  टक्के, ९८.४२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.   ग्रामीण भागातही आघाडी 

खेड तालुक्यातून ४१७९ मुले, ३४१५  मुली असे एकूण ९५४४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी ४०३२ मुले आणि ३३५९ मुली असे एकूण ७३९१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामध्ये खेड तालुक्याचा एकूण निकाल ९७.३२ टक्के लागला आहे. तर मुलींचा निकाल ९८.३६ टक्के लागला आहे. मावळ तालुक्यातुन २७३३ मुले, २६६६ मुली असे एकूण ५३९१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी २६७१  मुले, २६२२ मुली असे एकूण ५२९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९८.२२ टक्के लागला आहे. त्या मुलींची टक्केवारी ८९.७२ टक्के आहे. मुळशी तालुक्यातुन १७२२ मुले, १६५८ मुली असे एकूण ३३८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १६६५ मुले, १६२६ मुली असे ३२९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ९७.३६ टक्के लागला आहे. त्यामध्ये मुलींची संख्या ९८.०७ टक्के आहे. हवेली तालुक्यातून ८३९८ मुले, ६९७३ मुली असे एकूण १५ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी ८,१७८ मुले, ६८७८ मुली असे एकूण १५ हजार ०५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एकूण निकाल ९७.९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये मुलींची संख्या ९८. ६३ टक्के आहे.  गेल्या वर्षीपेक्षा निकाल वाढला 

पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या वर्षी ९७.९५ टक्के निकल लागला होता. त्यामध्ये मुलींची संख्या ९८.६१ टक्के होती. यावर्षी पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के लागला आहे. तर मुलींचा निकाल ९८.२१ टक्के लागला आहे. शहराचा निकाल ०.२ टक्क्यांनी वाढला आहे. तर मुलींचा निकाल घटला आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSSC Resultदहावीचा निकालssc examदहावीStudentविद्यार्थीSchoolशाळा