पवनानगर : मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील पवना नदीवरील ब्राम्हणोली येथील पूल अरुंद असल्याने नागरिकांकडून रुंदीकरणाची मागणी वाढत आहे. पुलाच्या सध्याच्या स्थितीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित पवनमावळ परिसरातील गावांसाठी तो महत्त्वाचा दळणवळणाचा असून, अनेक मार्ग आहे. मात्र पुलाची रुंदी कमी असल्याने दोन चारचाकी वाहने एकाच वेळी जाण्यास अडचण येते. त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागतो.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलावर अपघातांच्या घटना घडल्याचे ही निदर्शनास आले आहे. तरीही पुलाच्या सुधारणा किंवा रुंदीकरणाबाबत अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची भावना व्यक्त होत आहे.पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण करा
सध्याच्या पुलामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची ओलांडताना अडचण होत असल्याची तक्रार आहे. वाहतुकीदरम्यान वारंवार कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढल्याची नागरिकांची भावना आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पुलाचे लवकरात लवकर रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
'ब्राम्हणोली पूल आमच्या भागासाठी महत्त्वाचा आहे. मात्र त्याची सध्याची अवस्था लक्षात घेता रुंदीकरणाची आवश्यकता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - नारायण बोडके, सरपंच, ठाकूरसाई-खडक गेव्हंडे समूह ग्रामपंचायत दररोज या पुलावरून प्रवास करताना अडचणी येतात. दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालवणे कठीण होते. त्यामुळे पुलाचे रुंदीकरण व्हावे. - अतुल कालेकर, स्थानिक नागरिक या पुलावर वाहतुकीची वर्दळ असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. - आनंता खैरे, पोलिस पाटील, तिकोणा हा पूल अनेक गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीस सुलभता यावी यासाठी पुलाच्या रुंदीकरणाचा विचार होणे आवश्यक आहे. - संजय वर्वे, माजी उपसरपंच, तिकोणा ब्राम्हणोली पुलाचे रुंदीकरण त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. - स्वप्नील तुपे, माजी उपसरपंच, तिकोणा ग्रामपंचायत
Web Summary : The narrow Brahmanoli bridge over the Pavana River in Maval is causing traffic issues. Locals demand widening due to frequent congestion and accident risks, especially during the monsoon. Widening is crucial for smoother connectivity between villages. Officials are urged to take immediate action.
Web Summary : मावल में पवना नदी पर संकीर्ण ब्राह्मणोली पुल यातायात की समस्या पैदा कर रहा है। स्थानीय लोगों ने बार-बार होने वाली भीड़ और दुर्घटना के जोखिम के कारण पुल को चौड़ा करने की मांग की है, खासकर मानसून के दौरान। गांवों के बीच सुचारू कनेक्टिविटी के लिए चौड़ीकरण महत्वपूर्ण है। अधिकारियों से तत्काल कार्रवाई करने का आग्रह किया गया है।