शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत पालकांचे हेलपाटे सुरूच, कामकाज संथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:58 IST

- १५ एप्रिलला कागदपत्र जमा करूनही अनेक प्रवेश अद्यापही प्रलंबित 

पिंपरी : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत आकुर्डी येथील उन्नत शहर साधन केंद्रात पालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. केंद्रातील सूचना फलकावर ठरावीक तारखा देऊनही प्रत्यक्षात उद्या या असे सांगत १५ एप्रिलपासून वारंवार केंद्रात येऊनही अद्याप ॲडमिट पत्र मिळालेले नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

आकुर्डी केंद्राची कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी वेळेत आलो तरी ११:३० वाजल्यानंतर केंद्रात सोडले नाही, अशा तक्रारी काही पालकांनी केल्या. या केंद्रातील २२ पैकी केवळ १२ कर्मचारीच कार्यरत होते, तर १० कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामावर पाठविल्याने कामकाजावर परिणाम झाला. त्यातच आरटीई संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन असल्याने अडथळे येत होते. या केंद्रात दररोज २०० अर्जांची पडताळणी केली जाते.

पटपडताळणीच्या कामामुळे एकही कर्मचारी येथ हजर नव्हता. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीत बांगर यांनी स्वतः केंद्रात धाव घेतली होती. त्या दिवशी सुमारे ७५० पालकांची कागदपत्र जमा केली होती. यातील अनेक पालकांना आठवडा उलटूनही अद्याप ॲडमिट पत्र मिळालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. कागदपत्रांतील त्रुटी दुरुस्ती व योग्य कागदपत्र सादर करण्यासाठी काही पालकांना ये-जा करावी लागत आहे.

प्रवेश अर्ज सादर केलेल्या ज्या बालकांचे स्टेटस ‘ॲडमिटेड’ आहे, त्यांनी दररोज दुपारी ३ वाजता उपस्थित राहून प्रवेश पावती घ्यावी. तसेच १३ ते २० एप्रिलदरम्यान अर्ज सादर केलेल्या पालकांची कागदपत्र तपासणी २१ ते २७ एप्रिलदरम्यान सकाळी १०:३० वाजता उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

मी १६ एप्रिलला कागदपत्र जमा केले होते. त्यावेळी मला टोकन देत २० तारखेला बाेलावले. त्यानंतर २१ आणि २२ आणि २४ तारखेला सकाळी आठ वाजताच आलाे. मात्र, दुपारी एक वाजले तरी मला ॲडमिट पत्र मिळालेले नाही. - विकेश इंगळे, पालकमी १७ तारखेला कागदपत्र जमा केली. २४ तारखेला बोलावले होते. त्यानुसार मी सकाळी साडेदहा वाजता आलो. माझा १३४ वा नंबर आहे. येथील काम संथगतीने सुरू आहे. - प्रभाकर तळे, पालक 

 

आरटीई प्रवेश प्रक्रियेची आकडेवारीआकुर्डी केंद्र

एकूण शाळा : ११५

एकूण अर्ज (प्रवेश) : २६२९

प्रवेशित विद्यार्थी : १४७१

नाकारलेले अर्ज : १५

------------

पिंपरी केंद्र

एकूण शाळा : ६४

एकूण अर्ज (प्रवेश) : १३०२

प्रवेशित विद्यार्थी : ७६०

नाकारलेले अर्ज : ११ 

प्रवेश प्रक्रिया आकुर्डी आणि पिंपरी उन्नत शहर साधन केंद्रात सुरळीत सुरू आहे. पहिल्यापेक्षा गतीने कामकाज सुरू आहे. शुक्रवारी जनगणनेच्या कामासाठी या केंद्रातील कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवावे लागते. अशावेळी अन्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  - संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग 

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Admissions: Parents face hurdles, slow process continues in Pimpri.

Web Summary : Parents in Pimpri-Chinchwad are struggling with the slow RTE admission process. Despite repeated visits, admit letters are delayed. Staff shortages and server issues at Akurdi center exacerbate the problem, causing frustration among parents.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र