शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:20 IST

- बौर, करुंज व ब्राह्मणवाडीचे शेतकरी-जिल्हाधिकाऱ्यांची बैठक 

पवनानगर : मावळ तालुक्यातील बौर, करुंज व ब्राह्मणवाडी येथील शेतकरी आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यात दि. १५ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, संबंधित भागातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद करण्यात येतील. हा प्रकल्प होणारच असून, याबाबत वरिष्ठांना सविस्तर माहिती देऊन अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर घेतला जाईल.

यावेळी मोजणी प्रक्रियेला विरोध करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या. जमीन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, याची खात्री देण्यात आली. या भागात एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणावर विकास होईल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे सांगत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास संबंधित कार्यालयात नोंदवाव्यात, त्यावर योग्य ती कारवाई करून प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

या बैठकीस माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भरत भाई मोरे, संतोष दळवी उपस्थित होते.

ग्रामस्थांनी प्रस्तावित एमआयडीसीला एकमताने विरोध दर्शवत या भागात एजंटगिरीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या दस्ताची नोंदणी बंद व्हावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बौर हद्दीतील दस्त नोंदी थांबविण्याचे आदेश यावेळी दिले. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत. - बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Land Transactions for MIDC Temporarily Suspended After Farmers' Meeting

Web Summary : Following a meeting between farmers and the Collector, land transactions for the proposed MIDC in Baur, Karunj, and Brahmanwadi have been temporarily suspended. The Collector assured fair compensation and emphasized development and job opportunities. Farmers should register complaints for resolution, ensuring their involvement in the project.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड