शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : सोसायटीतच कचरा जिरवा; सहा वर्षांनी पुन्हा महापालिकेचा दंडाचा बडगा

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 15, 2026 11:01 IST

- १ एप्रिलपासून काटेकोर अंमलबजावणीचा दावा; ८७७ सोसायट्यांतून अजूनही महापालिकाच उचलते ओला कचरा

पिंपरी : शहरातील दररोज १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, रुग्णालये, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या आस्थापनांना महापालिका आरोग्य विभागाने पुन्हा एकदा ओला कचरा स्वतःच्या परिसरातच जिरविण्याचा इशारा दिला आहे. १ एप्रिलपासून घनकचरा व्यवस्थापन नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी २०१९ पासून सहा वर्षे अंमलबजावणी रखडली होती.

केंद्र शासनाच्या २७ जानेवारी २०२६ च्या अधिसूचनेनुसार, प्रतिदिन १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण होणाऱ्या किंवा मोठ्या क्षेत्रफळ/पाणी वापर असलेल्या आस्थापनांनी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास पहिल्यांदा ५ हजार, तर दुसऱ्यांदा १५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

२८८ टन कचरा होतो जमा

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरातील २३३ सोसायट्यांनी स्वतःच ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था उभी केली असून, तयार होणारे खत त्यांच्या बागा आणि हरित पट्ट्यांसाठी वापरले जाते. मात्र, अजूनही ८७७ सोसायट्यांमधून महापालिकाच ओला कचरा उचलत आहे. सोसायट्यांमधून दररोज २८८ टन कचरा निर्माण होत असल्याने, त्याचा ताण महापालिकेच्या यंत्रणेवर पडत आहे. 

वर्षभरात दंड केवळ ३५ हजार

गेल्या वर्षभरात १०१ नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र केवळ ३५ हजार रुपये दंडाची वसुली झाली. त्यामुळे कारवाईचा इशारा जास्त आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कमी, अशी टीका होत आहे. यापूर्वीही नोटिसा, मुदतवाढ आणि काही ठिकाणी नळजोड तोडण्याच्या कारवाया करण्यात आल्या होत्या.

सहा वर्षांपासून रखडली अंमलबजावणी

केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार २०१९ पासून महापालिकेकडून या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी आरोग्य विभागाने सोसायट्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. वेळोवेळी मुदत दिली. परंतु, सोसायट्या व राजकीय दबावातून कारवाईबाबत प्रशासनाने माघार घेतली. आता प्रशासनाने पुन्हा सोसायट्यांना इशारा दिला आहे. 

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने २७ जानेवारी २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून त्याप्रमाणे या नियमात बसणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांना ओला कचरा जिरविणे बंधनकारक आहे. त्यांनी तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. - डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका 

दृष्टिक्षेपात

- ओला कचरा स्वतः जिरवणाऱ्या सोसायट्या : २३३

- महापालिका अजूनही कचरा उचलते त्या सोसायट्या : ८७७

- वर्षभरात दिलेल्या नोटिसा : १०१

- वसूल दंड : ३५,०००

- सोसायट्यांमधून दररोज निर्माण होणारा कचरा : २८८ टन

- ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती : १० टक्के

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad: Societies Must Compost Waste; Municipality Threatens Fines Again

Web Summary : Pimpri-Chinchwad mandates on-site composting for large waste-generating societies. The municipality will fine non-compliant entities after a six-year implementation delay. Currently, only 233 societies compost, while 877 rely on municipal collection, straining resources. Limited fines were collected last year, indicating weak enforcement.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे