शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदार संख्या साडेतेरा लाख

By admin | Updated: September 2, 2016 05:45 IST

गत महापालिका निवडणुकीवेळी फेब्रुवारी २०१७मध्ये मतदारसंख्या ११ लाख ५२ हजार ५८८ इतकी होती. त्यामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मिळून

पिंपरी : गत महापालिका निवडणुकीवेळी फेब्रुवारी २०१७मध्ये मतदारसंख्या ११ लाख ५२ हजार ५८८ इतकी होती. त्यामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मिळून सुमारे दीड लाख मतदार वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाापालिका निवडणुकीवेळी शहरातील मतदार संख्या साडेतेरा लाखांच्या घरात पोहोचणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त यशवंत माने यांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण सोडत, सुनावणीचा कार्यक़्रम जाहीर झाला आहे. अनुसूचित जाती, जमाती आरक्षित प्रभागासह प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही बुधवारी ७ सप्टेंबरला होणार आहे. हा प्रस्ताव विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत तपासणी करून १२ सप्टेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०१७ला ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर महापालिकांची निवडणूक होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभारचना, सोडत, सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारूप प्रभागरचनेच्या प्रस्तावास २३ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल. ४ आॅक्टोबरला अनुसूचित जाती, जमाती, महिला व अन्य आरक्षणाची सोडत काढण्यासाठी महापालिका आयुक्तांमार्फत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला आदींची सोडत ७ आॅक्टोबरला काढली जाईल. १० आॅक्टोबरला सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. (प्रतिनिधी)- सन २०११ चे लोकसंख्येवर प्रभाग रचना करण्यात येणार असून, सन २०११ ची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या २,७३,८१० (१५.८४%) व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३६,५३५ (२.११%) ग्राह्य धरण्यात येणार असून, अनुसूचित जाती करिता २० जागा अनुजमाती करिता ३ जागा व नागरिकांचा मागासप्रवर्गाकरिता ३५ जागा राखीव राहतील. महापालिका आयुक्त १० आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबरपर्यंतचा कालावधी सूचना, हरकतींसाठी जाहीर करतील. राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रारूप प्रभागरचनेवर प्राप्त झालेल्या सूचना, हरकतींवर ४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होईल. सुनावणी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी नमूद करून महापालिका आयुक्त १० नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयुक्त अथवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करतील. राज्य निवडणूक आयुक्त २२ नाव्हेंबरला प्रारूप प्रभागरचनेवर प्राप्त हरकती, सूचनांचा विचार करून निर्णय देतील. सुनावणीनंतर झालेल्या निर्णयानुसार प्रभागरचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करून प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना २५ नोव्हेंबरला महापालिका आयुक्तांमार्फत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.