गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है ; राष्ट्रवादी काँग्रेसचं पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:18 PM2021-09-01T20:18:31+5:302021-09-01T20:22:54+5:30

भाजपच्या दोन आमदारांची सर्वात अगोदर नार्को टेस्ट करावी.

NCP's agitation in front of Pimpri Chinchwad Municipal Corporation | गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है ; राष्ट्रवादी काँग्रेसचं पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन

गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है ; राष्ट्रवादी काँग्रेसचं पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनेआंदोलन केले. ‘‘भाजपवाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय....’,  ‘ गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है... चोर है, भाजपवाले चौर है...अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी महापालिकेसमोर आंदोलन केले.

महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून  महापालिकेवर मोर्चा काढला.  हातगाड्यावर टोपली ठेवली होती. त्यात नकली पैसे ठेवले होते. त्यावर ‘‘खाऊ गल्ली’ असा उल्लेख होता.  ‘धरा दाम पण करा काम’’ करा अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर आंदोलन महापालिका प्रवेशद्वारावर पोहोचले. 

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, राजू बनसोडे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित लांडगे उपस्थित होते. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपच्या दोन आमदारांची सर्वात अगोदर नार्को टेस्ट करावी.
पिंपरी :   भाजपच्या मागणीनुसार स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या भाजपच्या दोन आमदारांची सर्वात अगोदर नार्को टेस्ट करावी. त्यामुळे भाजपने साडेचार वर्षात काय कारभार केला. यांचे सगळे पितळ उघडे पडेल, असे आव्हान राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी भाजपला दिले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत आमच्या कोणत्याही स्थायीच्या सदस्याला चौकशीसाठी बोलावले नाही. जर चौकशीला बोलावले तर त्याला आमचे सदस्य सामोरे जातील. स्थायी समिती बरखास्त करण्याची आमची मागणी आहे. भाजपने त्यांच्या सदस्यांचे राजीनामे घ्यावेत. आम्ही आमच्या सदस्यांचे राजीनामे घेतो. स्थायी समितीत लाच प्रकरण घडल्यापासून राष्ट्रवादीचा एकही सदस्य बैठकीला हजर नव्हता. यापुढेही स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहणार नाहीत.’’

Web Title: NCP's agitation in front of Pimpri Chinchwad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.