शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

नकुल भोईर खूनप्रकरण : चैतालीच्या प्रियकराच्या मोबाइलमधून मिळणार महत्त्वाचे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:16 IST

सिद्धार्थ पवार याचा मोबाइल फोन अद्याप मिळून आलेला नाही. त्यातून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावे मिळण्यास मदत होईल

पिंपरी : चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खूनप्रकरणात दोन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. नकुल याच्या पत्नीच्या प्रियकराचा मोबाइल फोन हस्तगत करायचा आहे, असे सांगून पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात केली होती. 

चैताली नकुल भोईर (२८, रा. माणिक काॅलनी, चिंचवड) आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. लिंकरोड, चिंचवड), अशी पोलिस कोठडी वाढवण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून त्‍यांची पत्‍नी चैताली हिने आपण एकटीने केल्‍याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली. चिंचवड येथील माणिक काॅलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ २४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास खुनाची ही घटना घडली.

चैताली हिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिला २४ ऑक्टोबर रोजी अटक केली. मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका पोलिसांना होती. त्‍यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्‍यात घेतले. मात्र त्‍या दोघांनीही पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्‍ह्याची उकल केली. या प्रकरणात सिद्धार्थ याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला २९ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर चैताली आणि सिद्धार्थ पवार यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

मोबाइल फोनसाठी कोठडीची मागणी

चैताली आणि सिद्धार्थ या दोघांनाही पुन्हा शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित सिद्धार्थ पवार याचा मोबाइल फोन अद्याप मिळून आलेला नाही. त्यातून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावे मिळण्यास मदत होईल, त्यामुळे मोबाइल फोन हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने चैताली आणि सिद्धार्थ या दोघांच्या पोलिस कोठडीत रविवारपर्यंत (दि. २ नोव्हेंबर) वाढ केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Nakul Bhoir Murder: Key Evidence Expected from Lover's Mobile

Web Summary : Nakul Bhoir's murder investigation continues. Police extended the custody of the wife and her lover, hoping to recover the lover's mobile phone for crucial evidence related to the crime. The phone is believed to hold vital information.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी