शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन मित्रांच्या मृत्यूने पसरली शोककळा

By admin | Updated: July 23, 2015 04:43 IST

बीसीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात ठार झाले. ही बातमी हे विद्यार्थी शिक्षण घेत

पिंपरी : बीसीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात ठार झाले. ही बातमी हे विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या आयआयसीएमआर या निगडी-प्राधिकरणातील महाविद्यालयात पोहोचली. एकाच महाविद्यालयातील, एकाच वर्गातील, घट्ट मैत्री असलेले आणि एकाच इमारतीत राहणारे तीन विद्यार्थी दगावले. मन हेलावून टाकणाऱ्या या बातमीने महाविद्यालयात बुधवारी शोककळा पसरली. व्यवस्थापनाने शोकसभा घेऊन महाविद्यालयाला सुटी दिली. निगडी-प्राधिकरणातील इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल अ‍ॅन्ड कॉम्प्युटर मॅनेजमेंट (आयआयसी एमआर) या महाविद्यालयाचा एरवी गजबजून जाणारा परिसर आज सुनासुना होता. कार्यालय खुले होते, सकाळी ९ वाजताच शोकसभा घेऊन विद्यार्थ्यांना सुटी दिल्याने विद्यार्थी कोणीच नव्हते. कामकाजासाठी काही कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. परंतु अत्यंत शांत, धीरगंभीर असे वातावरण असल्याने या परिसराला अवकळा आली होती. संस्थेच्या संचालक दीपाली सवाई म्हणाल्या, ‘‘तीन वर्षांपासून या महाविद्यालयात शिक्षण घेणारे हे तीन विद्यार्थी मनमिळाऊ होते. अभ्यासात हुशार होते. सर्वांत मिळून-मिसळून वागणाऱ्या या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. मंगळवारची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू हा महाविद्यालयावरसुद्धा दु:खाचा आघात आहे.विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना दक्षता घ्यावी. वाहन चालविताना एखादी चूक जिवावर बेतू शकते. आपल्या पालकांची, नातेवाइकांची मन:स्थिती काय होईल, याचा सारासार विचार करावा. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची चूक नाही. मोटारीने त्यांना धडक दिली.रात्रीच्या वेळी वाहनचालक कोणत्या अवस्थेत असतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी, असे या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. किरण धाणे, संकेत समेळ, शुभम भालेकर या विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी विद्यार्थी, शिक्षकांना अश्रू अनावर झाले. शोकसभा संपताच दु:खी अंत:करणाने विद्यार्थी बाहेर पडले. महाविद्यालयात शोककळा पसरली होती. (प्रतिनिधी)