शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पैसा पैसा चित्रपटावर होतोय अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 11:50 IST

 सैराट या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर चार आठवड्याने म्हणजे 20 मे पासून पैसा पैसा हा चित्रपट प्रदर्शित झाला. सचित ...

 सैराट या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर चार आठवड्याने म्हणजे 20 मे पासून पैसा पैसा हा चित्रपट प्रदर्शित झाला. सचित पाटील आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तिकीटबारीवर शुक्रवारपासूनच जोर धरत असताना, काही चित्रपटगृहातून शुक्रवारी पैसा पैसा चित्रपटाचे प्रसिद्धी फलक हटवण्यात आले आहेत.  ही बाब निमार्ता शिवविलाश चौरसिया यांच्या निदर्शनास येताच. निर्मात्यांनी आपल्या सहकाºयांसह काल शनिवारी पुण्यात आणि आज रविवारी मुंबईत सर्व सिनेमागृहांना भेटी दिल्या. त्यांनाही प्रसिद्धी फलक सिनेमागृहात आढळून आले नाहीत. त्यांनी सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांना विचारणा करताच, आहेत पण लावायचे राहून गेले....अशी थातुरमातूर उत्तर दिली गेली. तर काहींनी प्रसिद्धी फलक पोहोचले नसल्याचे खोटे सांगितले. शिवविलाश यांनी काही व्यवस्थापकांना हिसका देताच, गोडाऊनमध्ये टाकलेले पोस्टर्स, स्टॅण्डीज्, पुन्हा काढून लावण्यास काहींनी सुरूवात केली. तर काहींनी चुक कबूल करून निमार्ता शिवविलाश चौरसिया यांची माफी मागितली. हे सर्व घडत असताना उत्तर देताना व्यवस्थापक कुणाच्यातरी दबावाखाली आहेत, याची जाणीव निर्मात्यांना झाली. सिनेमाला दुपारी १२ वाजताची वेळ बहुतेक सिनेमागृहात मिळाली आहे आणि प्रयोगाची वेळ झाली तरी काही एकपडदा सिनेमागृहाच्या तिकीटबाºया उघडल्या नसल्याच्या तक्रारी निर्मात्यांकडे आल्याने, यात काहीतरी राजकारण होत असल्याचा संशय निमार्ता शिवविलाश चौरसिया यांना वाटत आहे. सैराट मुळे थिएटर मिळविण्यात आणि मिळूनही खेळ दाखविण्याची योग्य वेळ  मिळण्यात असंख्य अडचणी आल्या तरीही पैसा पैसा प्रदर्शित करण्याचं धाडस शिवविलाश चौरसिया यांनी दाखविले. मराठी सिनेमांची गळचेपी होत असताना, चांगल्या सिनेमांचे पोस्टर्स गायब करण्याचा हा नवा फंडा काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू झाला आहे. मराठी रसिकप्रेक्षकांसाठी, एका भैय्या माणसाने निर्मिती केलेल्या पैसा पैसा या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सिनेक्षेत्रातील काही धास्तावलेल्या मंडळीनी चित्रपट पाडण्यासाठी हे असले उद्योग चालवल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.