Married woman tortured by husband family to take new home | घर घेण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांकडून छळ
घर घेण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांकडून छळ

पिंपरी : नवीन घर व गाडी  घेण्यासाठी वारंवार विवाहितेकडे पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून मानसिक छळ केला. ही घटना सांगवी येथे मार्च २००९ ते ६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सांगवी येथे घडली. 
            या प्रकरणी ३३ वर्षीय विवाहितेने पोलिसांत धाव घेतली असून सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, पती कुंदन शेषराव कसबे (वय ३८, रा. सांगवी), सासरे शेषराव बाजीराव कसबे (वय ६६), सासू नंदा शेषराव कसबे (वय ६६), नरेंद्र शेषराव कसबे (वय ३२) व वर्षा जिवन कांबळे (वय ३४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्च २००९ मध्ये कुंदन कसबे यांच्यासोबत विवाह झाला. त्यानंतर सासरी नांदत असताना सासरच्या मंडळीनी वारंवार नवीन घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी पैशाची मागणी केली. तसेच नवीन प्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच वारंवार शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Married woman tortured by husband family to take new home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.