शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणीकर समस्येने हैराण

By admin | Updated: October 14, 2016 05:37 IST

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, आपले शहर खरेच स्वच्छ व सुंदर

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, आपले शहर खरेच स्वच्छ व सुंदर आहे का, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे . रहाटणी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. या ठिकाणी कचराकुंडी नसल्याने नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत आहेत. अनेक वेळा हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रहाटणी चौक, नखाते वस्ती चौक, रहाटणी फाटा यांसह अनेक परिसरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पूर्वी या ठिकाणी कचराकुं ड्या होत्या. मात्र, घरोघरी कचरा उचलण्यासाठी गाड्या जात असल्याचे कारण पुढे करत परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहे. ज्या ठिकाणी कचराकुंड्या होत्या, त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने या ठिकाणी येथे कचरा टाकू नये, असे फलक लावले आहेत. तरीही नागरिक या ठिकाणीच कचरा टाकत आहेत. नागरिकांच्या मते कचरा उचलणाऱ्या गाड्या दोन-दोन दिवस येत नसल्याने नागरिकांची फसगत होत आहे.घरात कचरा किती दिवस ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे नागरिक नाइलाजाने पूर्वी या ठिकाणी कचराकुंड्या होत्या. त्या ठिकाणी सर्रास कचरा टाकत आहेत. हा कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात साचत आहे की, काही वेळा हा कचरा त्याच ठिकाणी कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ होत असून, अनेक साथीच्या आजारांना प्रोत्साहन मिळत आहे. सध्या परिसरात साथीच्या विविध आजारांनी नागरिक हैराण आहेत . पालिका रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा दिसून येत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरातील ठिकठिकाणी साचलेला कचरा रोजच्या रोज वेळेवर उचलण्याची मागणी रहाटणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)