शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १७ कोटी ७५ हजारांची फसवणूक; हिंजवडीत ८ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 14:08 IST

या रकमेद्वारे देश विदेशात मालमत्ता खरेदी...

पिंपरी : अधिक परताव्याचे आमिष दाखवून १७ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दीपक सखाराम कोहकडे यांच्यासह सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेवींचे अकरा करारनामे करून अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बांधकाम व्यावसायिक संदीप सुधीर जाधव (वय ४०, रा. सिंधू बंगलो, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. डी. एस. के. अँड असोसिट्स चे भागिदार दीपक सखाराम कोहकडे, त्यांची पत्नी भारती दीपक कोहकडे, त्यांचा मुलगा अश्विनीकुमार दीपक कोहकडे (सर्व रा. सोपनबाग, बालेवाडी), दीपक कोहकडे यांचा मेहुणा अनंता भिकूले (रा. बालेवाडी), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह स्नेहल ओसवाल (रा. ईथुपिया डिव्हाईन, रुबी हॉल क्लिनिक जवळ, वानवडी), भागीदार हर्षद अशोक कुलकर्णी (रा. वूडलँड रेव्हेन्यू, गांधीभवन, कोथरूड), नोटरी आशिष ताम्हाणे (रा. बाणेर) व त्यांच्या इतर साथीदारांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी एका ओळखीच्या इसमाच्या मार्फत कोहकडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी ज्यादा परताव्याच्या आमिषाने मोठ्या रक्कमेच्या मुदत ठेव रक्कमा स्वीकारल्या. काही ठेवींवर त्यांनी चांगला परतावा दिला. आणखी जादा रकमेच्या ठेवी ठेवण्यास भाग पाडले. ठेव रक्कमेचे आठ वेगवेगळे नोटराईज करारनामे केले. करारनाम्या प्रमाणे गुंतविलेल्या रक्कमेवर परतावा दिला नाही. पूर्वीचे करारनामे रद्द करत नववा करारनामा करीत आकर्षक परतावा आणि मुद्दल देण्याचे कबुल केले. असे एक अकरा करारनामे केले. ठेवी परत न करता १७ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. या रक्कमेद्वारे देश विदेशात मालमत्ता खरेदी केली. तसेच कोहकडे यांना काही झाल्यास अथवा त्यांचा मृत्यू आल्यास त्याला फिर्यादी जबाबदार असतील. हाच मृत्यूपूर्व जबाब असेल अशी नोटीस वकिलामार्फत पाठवून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस