शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या भीतीने रात्र काढली झाडावर

By admin | Updated: July 22, 2015 03:10 IST

: मध्यरात्रीची वेळ.., पंचवीस ते तीस कुत्री मागे लागलेली..., त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तरुण चक्क झाडाच्या बुंध्यावर जातो...,

तळेगाव स्टेशन : मध्यरात्रीची वेळ.., पंचवीस ते तीस कुत्री मागे लागलेली..., त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तरुण चक्क झाडाच्या बुंध्यावर जातो..., झाडाखालून कुत्री हटत नाहीत. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार कराऱ्याला गेल्यानंतर प्रशासनाने त्या तरुणाकडे पन्नास जणाच्या सह्याचे निवेदन मागितले. वरकरणी ही गोष्ट एकाद्या चित्रपटातील वाटेल, पण ही तळेगावमध्ये घडलेली सत्य घटना आहे. तळेगावात राहणारा जितेंद्र कुस्ते (वय ३३) हा तरुण शनिवारी रात्रपाळीवरून घराकडे जात असताना स्टेशन ते जिजामाता चौकदरम्यान मेथॉडिस्ट शाळेजवळ त्याला सात-आठ कुत्र्यांनी गाठले व पाठलाग केला. भीतीपोटी तो झाडावर चढला. कुत्र्यांनी झाडाच्या बुंध्याशी ठाण मांडल्याने ती काही हटायला तयार होइनात. बिचारा रात्री ११.४५ ते ३ वाजेपर्यंत पहाटे झाडावरच बसून राहिला. नंतर कुत्री पांगल्याने कसेबसे ध्यान चुकवत धापा टाकत घर गाठले.दुसऱ्या दिवशी या संदर्भात कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तक्रार करायला गेला असता, तेथील कर्मचाऱ्यांनी ४०-५० लोकांच्या सह्यांसह निवेदनाचा सल्ला देऊन परतवून लावले.सोमाटणे फाटा व खिंड परिसरात मोकाटे कुत्रे आणून सोडतात. तीच कुत्री प्रामुख्याने तळेगावात येऊन उच्छाद मांडत असल्याचे बोलले जाते. मागे ५-६ महिन्यांपूर्वी पालिकेने बाहेरचे सराईत कुत्रे पकडणारे व पिंजरे आणून, काही कुत्री पकडून नेली होती. पालिकेकडे जरी स्वत:ची सामग्री नसली, तरी बाहेरच्या ठेकेदाराला बोलावून या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. यावर प्रतिक्रियेसाठी तळेगाव नगर परिषदेत संपर्क साधला असता, कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही.(वार्ताहर)