दुसरी बिडी देणार नाही? अन् थेट...; मजुरावर चाकूचा प्राणघातक वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 19:05 IST2026-05-06T19:04:44+5:302026-05-06T19:05:15+5:30
Crime News : बिडी न दिल्याच्या कारणावरून एका कामगारावर चाकूहल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दुसरी बिडी देणार नाही? अन् थेट...; मजुरावर चाकूचा प्राणघातक वार
पिंपरी : पिण्यासाठी दुसऱ्यांदा बिडी न दिल्याच्या कारणावरून एका कामगारावर चाकूहल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मोशी येथे एका ऐश्वर्यम हमारा लेबर कॅम्पमध्ये सोमवारी (दि. ४ मे) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.
यासुद्दीन सादिक मियाँ अन्सारी (वय २४, रा. ऐश्वर्यम हमारा लेबर कॅम्प, मोशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रिदय ऊर्फ राहुल विकास मंडल (वय १९, सध्या रा. मोशी, मूळगाव भोपाळ, मध्य प्रदेश) असे जखमी मजुराचे नाव असून, त्यांनी मंगळवारी (दि. ५ मे) याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल आणि त्याचे मित्र खोलीमध्ये जेवण करत होते. त्यावेळी यासुद्दीन अन्सारी याने राहुलकडे दुसऱ्यांदा बिडी मागितली, मात्र राहुलने ती देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून संशयिताने शिवीगाळ करत फिर्यादी राहुलवर चाकूने हल्ला केला.