शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध, वाद अन् भयावह शेवट..! पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:06 IST

Crime news - सुभान शेख आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता.

पिंपरी :  प्रेमप्रकरणातून थेरगाव परिसरात १९ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी (दि ८) रात्री खून करण्यात आला आहे. संशयितांनी तरुणावर आणि त्याच्या चुलत भावावर चाकू व चॉपरने हल्ला केला. त्यात सुभान हमीद शेख (वय १९, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) याचा मृत्यू झाला असून, त्याचा चुलत भाऊ अर्शद रमजान शेख (वय २१, रा. थेरगाव) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी (दोघेही रा. थेरगाव) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी मृत सुभानचे वडील हमीद नझीर शेख यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभान शेख आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता. तरुणीच्या आईचा मित्र असलेला संशयित विशाल सूर्यवंशी याने सुभानला या प्रेमसंबंधातून बाजूला होण्यास सांगितले होते. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास थेरगावमधील शिवशंकर कॉलनी आणि श्रीकृष्ण दूध डेअरीसमोरील रस्त्यावर विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभानला गाठले. त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात संशयितांनी जवळ असलेल्या चाकू आणि चॉपरने सुभानच्या हातावर, पोटावर आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात सुभानचा मृत्यू झाला. सुभानला वाचविण्यासाठी आलेल्या अर्शदवरही हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी विशाल आणि अनिकेत यांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Love affair, dispute, and horrific end: Youth murdered in Pimpri-Chinchwad.

Web Summary : A 19-year-old was murdered in Thergaon due to a love affair. Suspects attacked him and his cousin with knives, killing Subhan Sheikh and seriously injuring Arshad Sheikh. Police arrested Vishal and Aniket Suryavanshi. The murder stemmed from the victim's relationship, opposed by the girl's mother.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र