शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाच्या तणावातून १२ वीच्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली; हॉल तिकीट आणलं अन् तासाभरातच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 23:47 IST

प्रणय हा भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता.

पिंपरी : अभ्यासाचा तणाव आणि परीक्षेच्या भीतीतून बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि ६) दुपारी उघडकीस आली आहे. भोसरी संत तुकारामनगरात घटना घडली. प्रणय सुनील खैरे (१७, संत तुकारामनगर, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याने नाव आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. कॉलेजमधील प्रकल्प अपूर्ण राहिल्याने तसेच प्रात्यक्षिक परीक्षा न दिल्यामुळे तो चिंतेत होता.

आईसोबत आज प्रणय हा राजमाता जिजाऊ महाविद्यालयात परिक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. परतल्यानंतर आई बँकेत कामावर गेली, तर वडील गावी गेले होते, असे नातेवाईकांनी सांगितले.

आत्महत्या घटनेमुळे परिसरात हळहळ

घरात एकटा असताना प्रणयने टोकाचा निर्णय घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून भोसरी पोलीस तपास करीत आहेत. आत्महत्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stress Kills: 12th Grader Ends Life After Hall Ticket

Web Summary : A 17-year-old student in Bhosari, stressed about exams and incomplete college projects, committed suicide. He obtained his hall ticket hours before taking the tragic step. Police are investigating the cause.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे