भाजपची सूत्रे जगतापांच्या हाती; पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:19 AM2023-07-19T09:19:01+5:302023-07-19T09:19:43+5:30

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच शहराध्यक्ष पदासाठी शंकर जगताप यांचे नाव चर्चेत

BJP sources in the hands of Jagtaps Laxman Jagtap brother Shankar Jagtap as city president of Pimpri Chinchwad | भाजपची सूत्रे जगतापांच्या हाती; पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप

भाजपची सूत्रे जगतापांच्या हाती; पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप

googlenewsNext

पिंपरी : भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे मावळते शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केली आहे.

आमदार महेश लांडगे यांचा शहर अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहराला नवीन कारभारी मिळणार याबाबतची चर्चा सुरू होती. त्यामध्ये निष्ठावान की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच शहराध्यक्ष पदासाठी शंकर जगताप यांचे नाव चर्चेत होते. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी  प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे.

Web Title: BJP sources in the hands of Jagtaps Laxman Jagtap brother Shankar Jagtap as city president of Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.